ऑडीला टक्कर देणारी Porsche Macan Facelift भारतात लाँच, किंमत तब्बल…

| Updated on: Jul 29, 2019 | 10:25 PM

जर्मनीची सुपर लग्झरी कार निर्माता कंपनी पोर्शेने (Porsche) नवीन Porsche Macan Facelift लाँच केली आहे. ही कार आता पूर्वीपेक्षा अधिक अॅडवांस्ड आहे आणि तसेच यात अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये दोन व्हेरिअंट Macan आणि Macan S उपलब्ध आहेत.

ऑडीला टक्कर देणारी Porsche Macan Facelift भारतात लाँच, किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : जर्मनीची सुपर लग्झरी कार निर्माता कंपनी पोर्शेने (Porsche) नवीन Porsche Macan Facelift लाँच केली आहे. ही कार आता पूर्वीपेक्षा अधिक अॅडवांस्ड आहे आणि तसेच यात अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये दोन व्हेरिअंट Macan आणि Macan S उपलब्ध आहेत.

नवी Porsche Macan facelift मध्ये दोन इंजिन ऑप्शन मिळेल. यामध्ये एक 2.0 लिटरचं इंजिन मिळेल, जे 248 पीएस पावर आणि 370 न्यूटन मीटर टॉर्क देईल. त्याशिवाय, यामध्ये 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशनही देण्यात आले आहेत. कारची टॉप स्पीड 229 kmph आहे. 100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला फक्त 6.7 सेकंदाचा वेळ लागतो. एक लिटर पेट्रोलमध्ये ही कार 12.34 किलोमीट इतकं मायलेज देते.

Macan S मध्ये 3.0 लिटरचा ट्वीन टर्बो V-6 इंजिन देण्यात आला आहे, जो 354 पीएस पावर आणि 480 न्यूटन मीटरचा टॉर्क देतो. तसेच यामध्ये 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन देण्यात आले आहेत. या कारची टॉप स्पीड 254 kmph आहे आणि 100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला 5.4 सेकंद लागतात. एक लिटर पेट्रोलमध्ये 11.23 किलोमीटर इतकं मायलेज देण्याची या कारची क्षमता आहे.

2019 Porsche Macan facelift चा लूक वेगळा आणि फ्रेश आहे. यामध्ये 20 इंचाचे Alloy चाकं लावण्यात आली आहेत. त्याशिवाय याच्या इंटिरिअरमध्येही नाविन्य जाणवतं. या कारच्या डॅशबोर्डमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन 10.9 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम लावण्यात आला आहे, जो पॉर्श कम्युनिकेशन मॅनेजमेंट सिस्टीम, अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करतो.

नव्या Porsche Macan Facelift ची एक्स शोरुम किंमत 69.98 लाख रुपये आहे. तर याच्या S व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 85.03 लाख रुपये आहे. या मॉडलमध्ये 4 कलर व्हेरिअंट Miami Blue, Mamba Green Metallic, Dolomite Silver Metallic आणि Crayon उपलब्ध आहेत. भारतात या कारची टक्कर Audi Q5 आणि Jaguar F-Pace या गाड्यांशी राहील.

संबंधित बातम्या :

टाटाची जबरदस्त कार लवकरच भारतात, किंमत फक्त…

Honda भारतात हायब्रीड कार लाँच करणार? किंमत फक्त…

हफ्त्यावर घेतलेलं वाहन विकायचं असेल तर काय कराल?

कमी किंमत, जास्त मायलेज, इलेक्ट्राच्या तीन स्कूटर लाँच