AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी किंमत, जास्त मायलेज, इलेक्ट्राच्या तीन स्कूटर लाँच

वाढत्या प्रदुषणामुळे देशात इलेक्ट्रॉनीक कार वापरण्यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन केलं जात आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रॉनीक कार आणि बाईक लाँच केली आहे.

कमी किंमत, जास्त मायलेज, इलेक्ट्राच्या तीन स्कूटर लाँच
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 25, 2019 | 6:32 PM
Share

पुणे : वाढत्या प्रदुषणामुळे देशात इलेक्ट्रॉनीक कार वापरण्यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन केलं जात आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रॉनीक कार आणि बाईक लाँच केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील Techo Electra स्टार्ट अप कंपनीनेही तीन इलेक्ट्रॉनीक स्कूटर लाँच केल्या आहेत. Neo, Raptor आणि Emerge अशी या तीन मॉडेलची नावं आहेत.

Techo Electra च्या तीन स्कूटरची किंमत 43 हजार 967 पासून सुरु होत आहे. या तिन्ही स्कूटरची किंमत प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे या स्कूटरची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

  • Techo Electra Neo : 43,967 रुपये
  • Techo Electra Raptor : 60,771 रुपये
  • Techo Electra Emerge : 72,247 रुपये

Techo Electra च्या तिन्ही मॉडलमध्ये Raptor सर्वात वरचा मॉडल आहे. तर  Emerge कंपनीचा फ्लॅगशिप मॉडल आहे. कंपनीने या तिन्ही स्कूटरमध्ये हब-माऊंटेड BLDC मोटारचा वापर केला आहे. जो 250 व्हॅटचा आहे. कंपनीने Emerge स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे. तर Neo आणि Raptor मध्ये अॅसिडचा वापर केलेला आहे.

Neo आणि Raptor मॉडल पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 7 तास लागतात. तर Emerge ला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. Neo पूर्ण चार्ज झाल्यावर 60 ते 65km, Raptor 70 ते 85km आणि Emerge 80km मायलेज देतात.

Techo Electra   च्या स्कूटरमध्ये एलईडी हेडलाईट्स, यूएसबी चार्जिंग आणि सेंट्रल लॉकिंगसारखे फीचर दिले आहेत. याशिवाय फ्रंट डिस्क ब्रेक, रिव्हर्सिंग फंक्शन डिजिटल एलसीडी इंस्ट्रूमेंट कन्सोलसराखेही फीचर दिलेले आहेत.

संबधित बातम्या :

सर्वात जास्त मायलेज देणारी बजाजची नवी बाईक, किंमत फक्त….

Hero MotoCorp च्या ‘या’ बाईकच्या किंमतीत वाढ

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत