Hero MotoCorp च्या 'या' बाईकच्या किंमतीत वाढ

हीरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) आपल्या प्रीमियम स्पोर्ट्स बाईक Xtreme 200s च्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे Xtreme 200s खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

Hero MotoCorp च्या 'या' बाईकच्या किंमतीत वाढ

मुंबई : हीरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) आपल्या प्रीमियम स्पोर्ट्स बाईक Xtreme 200s च्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे Xtreme 200s खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे. भारतात Xtreme 200s ची एक्स शोरुम किंमत 98 हजार 500 रुपये आहे. पण कंपनीने बाईकच्या किंमतीत 900 रुपयांची वाढ केली आहे. किंमत वाढल्यानंतर आता या बाईकची किंमत 99 हजार 400 रुपये झाली आहे. यावर्षी हीरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) लाँच केलेल्या Xtreme 200R बाईकच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे.

Hero Xtreme 200S मध्ये 200CC चा सिंगल-सिलेंडर एअर-कूल इंजन दिले आहे. हे इंजिन 18.4PS पॉवर आणि 17.1NM टॉर्क जनरेट करते. याशिवाय बाईकमध्ये 5 स्पीड गिअर दिले आहेत. बाईकच्या फ्रंटमध्ये टेलेस्कॉपिक फॉर्क्स आणि रिअरमध्ये 7 स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक दिले आहेत.

Xtreme 200S  च्या फ्रंटमध्ये 276mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 220 mm डिस्क ब्रेक दिला आहे. ही बाईक सिंगल चॅनल ABS आहे. बाईकचे वजन 149kg आहे. बाईकच्या सीटची उंची 795 mm आणि ग्राऊंड क्लीयरेन्स 165 mm आहे.

बाईकमध्ये फुल LED हेड लॅम्प, टेल लॅम्प आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल LED इन्स्ट्रूमेन्ट क्लस्टर दिले असून टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर पोजिशन इंडीकेटर, ट्रिप मीटर आणि सर्व्हिसे रिमायन्डर अलर्ट दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *