AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती, पंतप्रधान की भारताचे सरन्यायाधीश, कोणाचा पगार आहे सर्वात जास्त ?

पंतप्रधान यांना किती वेतन असते ? त्यांना राष्ट्रपती किंवा चिफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्याहून कमी वेतन असते ? की जादा...चला तर जाणून घेऊयात...

राष्ट्रपती, पंतप्रधान की भारताचे सरन्यायाधीश, कोणाचा पगार आहे सर्वात जास्त ?
HIGH SALARY POSTImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 11, 2024 | 8:54 PM
Share

लोकसभा 2024 च्या निवडणूकांचा निकाल लागला आहे. एनडीएला बहुमत मिळाल्याने भाजपाप्रणित सरकार विराजमान झाले आहे. रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लागोपाठ तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला मिळणाऱ्या सुविधा आणि वेतन खास असते. त्यांना सरकारी निवासस्थान आणि एसपीजीची सुरक्षा मिळते. परंतू तुम्हाला माहीती आहे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि चिफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्यापैकी कोणाला जास्त वेतन आणि सुविधा मिळतात.

पीएम नरेंद्र मोदी यांना लागोपाट तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेता आली आहे. त्यांच्या आधी सलग तीन वेळा केवळ पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले होते. पंतप्रधान पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. परंतू त्यांना मिळणाऱ्या सुविधा देखील खास असतात. त्यांना अधिकृत सरकारी निवासस्थान असते. परदेश प्रवासात त्यांच्या राहण्याचा खर्च आणि इतर सर्व खर्च सरकार करते. परंतू देशाच्या पंतप्रधानांना किती वेतन असते ? त्यांचे वेतन राष्ट्रपती किंवा चिफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्याहून जास्त असते की कमी असते ? चला तर जाणून घेऊयात…

पंतप्रधानांना किती वेतन ?

देशाच्या पंतप्रधानांना दर महिन्याला 1.66 लाख रुपये वेतन म्हणून दिले जाते. यात 50 हजार रुपए बेसिक वेतन असते. तर 3 हजार रुपए खर्चासाठी भत्त्यांच्या स्वरुपात मिळतात. तर 45 हजार रुपयांचा संसदीय भत्ता मिळतो. याशिवाय त्यांना 2 हजार रुपयांचा दैनिक भत्ता देखील दिला जातो.

भारतात पंतप्रधानांना ते पदावर असे पर्यंत सोयी सुविधा दिल्या जातात. परंतू पद सोडल्यानंतर देखील त्यांना काही सोयी आणि सुविधा माजी पंतप्रधान म्हणूक कायम मिळतात. पहली पाच वर्षे माजी पंतप्रधानांना सरकारी घर मिळते. वीज, पाणी आणि एसपीजीची सुरक्षा मिळते. दिल्लीत उच्चभ्रू अशा ल्युटियंस झोन मध्ये आजीवन मुफ्त निवास, आजीवन नि:शुल्क आरोग्य सुविधा आणि पद सोडल्यानंतरही पाच वर्षांपर्यंत 14 लोकांचा सेक्रेटरी स्टाफ देखील सेवेसाठी मिळतो.

भारताच्या राष्ट्रपतींना वेतन किती ?

भारताच्या राष्ट्रपतींना अनेक अधिकार असतात. ते तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख असतात. त्यांच्याजवळ पंतप्रधानासह अनेक पदांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतात. तसेच संसदेचे अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार त्यांना असतो. तसेच संसदेचे अधिवेशन बोलाविण्याबरोबरच ते स्थगित करण्याचा देखील अधिकार असतो. राष्ट्रपतींना वेतनासह अनेक भत्ते मिळत असतात. देशाच्या पंतप्रधानांना दर महिन्याला 5 लाख रुपये वेतन दिले जाते. याशिवाय अनेक भत्ते दिले जातात. त्यांच्यावर कोणताही कर नसतो.

त्यांना जगभर ट्रेन आणि विमानातून मोफत प्रवास करण्याचा अधिकार असतो. त्यांना आरोग्य सुविधा आणि कार्यालयाचा खर्च देखील दिला जातो. कार्यालयीन खर्चासाठी त्यांना दरवर्षी 1 लाख रुपए दिले जातात. पदावरुन निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना दर महिन्याला 1.5 लाख रुपये पेंशन दिली जाते. त्याशिवाय मोफत सरकारी घर, दो फ्री लॅंडलाइन फोन, एक मोबाइल फोन आणि पाच खाजगी कर्मचारी दिले जातात.

देशाच्या मुख्य सरन्यायाधीशांना किती वेतन मिळते ?

देशाच्या विधी आणि न्याय विभागाने दिलेल्या माहीतीनूसार देशाच्या सर्वौच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना दर महिन्याला 2,80,000 रुपयांचे वेतन दिले जाते. पद सोडल्यानंतर माजी सरन्यायाधीशांना 16,80,000 रुपये वार्षिक पेन्शन म्हणून दिले जातात. त्यासोबत भत्ता देखील दिला जातो. माजी चिफ जस्टीस ऑफ इंडिया पदावरील व्यक्तीला एकरकमी 20 लाख रुपए ग्रॅच्युईटी म्हणून दिली जाते.

रिटायरमेंट नंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सिव्हील सर्व्हीस क्लास वन ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मेडीकल सुविधा आणि संरक्षण मिळते. तर, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना 2.50 लाख रुपये मासिक वेतन आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना दर महिन्याला 2.50 लाख रुपये वेतन मिळते. तर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना दर महिन्यास 2.25 लाख रुपये वेतन मिळते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.