पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश

रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने, बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Ward Boy Illegally selling Remdesivir Injection).

चेतन पाटील

|

Sep 24, 2020 | 7:07 PM

पुणे : कोरोना आणि निमोनिया या आजारांवर उपचारासाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिवीर या इंजेक्शनची चढ्या दराने, बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या वॉर्डबॉयचाही समावेश आहे. हा प्रकार आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे (Ward Boy Illegally selling Remdesivir Injection).

पिंपरी चिंचवडचे रहिवासी मुस्तफा तांबोळी यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्शन त्यांना मिळत नव्हते. दरम्यान, त्यांना संबंधित रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने ज्यादा दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले (Ward Boy Illegally selling Remdesivir Injection).

रेमडेसिवीर इंजेक्शनची खरी किंमत 5 हजार 400 रुपये इतकी आहे. मात्र, मुस्तफा तांबोळी यांना या इंजेक्शनसाठी 14 हजार 500 रुपये मोजावे लागले. मात्र, तरीदेखील मुस्तफा आपल्या आईला वाचवू शकले नाहीत. त्यानंतर मुस्तफा यांच्या एका मित्रासोबतही असाच प्रकार सुरु असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला.

स्थानिक प्रशासनाने या तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने प्रकरण आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहचलं. तेव्हा निगडी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. यात संबंधित रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. पण हा प्रकार रुग्णालयाबाहेर घडला असं सांगून रुग्णालय प्रशासनाने हात झटकले आहेत.

पोलिसांनी चौकशी करत तीनही आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध, सौंदर्य प्रसाधने कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित रुग्णालयाच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

या सगळ्या गोष्टींना औषधांचा तुटवडा हे कारण आहे. हॉस्पिटलच्या आवारात या घटना घडलेल्या नाहीत. या घटना खरच घडल्या की नाही, याची शाहनिशा पोलिसांनी करावी. या प्रकरणात औषध विकणाऱ्यांसह विकत घेणारेही दोषी आहेत. हॉस्पिटल वगळता इतर मेडीकलमध्ये औषध उपलब्ध असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी चढ्या दरात औषधाची खरेदी का केली, याची चौकशी पोलिसांनी करावी.

या प्रकरणात हॉस्पिटलचा काहीही संबंध नाही. याप्रकरणात दोन्ही बाजूंनी कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी विकत घेतलं आणि ज्यांनी विकलं अशा दोघांवर कारवाई झाली पाहिजे.

कोरोना संकटात आम्ही जीव धेक्यात घालून रुग्णसेवा करत आहोत. स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची डॉक्टर आणि नर्सेसविषयी चांगलीच भावना आहे. अशाप्रकारच्या घटनांमुळे आमच्या डॉक्टर पेशावर डाग लागत आहेत.

याप्रकरणात तक्रारदाराने हॉस्पिटलचं नाव घेतलं असेल तर त्यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा करु. हॉस्पिटलच्या कुठलाही माणूस यात सहभागी नाही. तक्रादाराने जे काही केलंय त्यात त्याचे आर्थिक हितसंबंध असावेत. या गोष्टीची जेव्हा शहानिशा होईल तेव्हाच हॉस्पिटलचं नाव घेण्यात यावं.

-संबंधित रुग्णालयाचे मुख्याधिकारी

हेही वाचा : Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना कोरोना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें