बेडरुममधला तो फोटो नेमका काढला कुणी? प्रियांका म्हणते…

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्न झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. लग्नाअगोदर ती तिच्या डेटिंगमुळे चर्चेत होती, तर लग्नानंतर तिचा पती आणि अमेरिकन सिंगर निक जोनससोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. असाच एक फोटो प्रियांकाने शेअर केला होता, ज्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलं. या फोटोवर तिनेच आता स्पष्टीकरण दिलंय. प्रियांकाने बेडरुममधला फोटो शेअर केल्यानंतर […]

बेडरुममधला तो फोटो नेमका काढला कुणी? प्रियांका म्हणते...
Follow us

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्न झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. लग्नाअगोदर ती तिच्या डेटिंगमुळे चर्चेत होती, तर लग्नानंतर तिचा पती आणि अमेरिकन सिंगर निक जोनससोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. असाच एक फोटो प्रियांकाने शेअर केला होता, ज्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलं. या फोटोवर तिनेच आता स्पष्टीकरण दिलंय.

प्रियांकाने बेडरुममधला फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं होतं. बेडरुममध्ये फोटोग्राफर लपलाय का, अशा शब्दात या फोटोचा समाचार घेतला होता. तर दुसरीकडे काही चाहत्यांना प्रियांकाच्या फोटोवर चांगल्या कमेंटही केल्या होत्या. पण हा फोटो नेमका काढला कुणी? तर हा फोटो प्रियांकाची चुलत बहीण दिव्याने काढला होता. दिव्या ही देखील लॉस एंजेलिसमध्येच राहते.

प्रियांकाने आपल्या पतीसोबतचा बेडरुममधला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये निकच्या खांद्यावर प्रियांका डोकं ठेवून झोपलेली होती, तर निक जोनस टीव्ही पाहत होता. प्रियांकाने फोटो कॅप्शनमध्ये ‘होम’ असं लिहिलं. मात्र हा फोटो पब्लिक प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने युजर्सला कदाचित आवडलं नाही. यामुळे त्यांच्या फोटोवर येणाऱ्या कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.

एका युजरने सवाल केला, की तुमच्या बेडरुममध्ये फोटोग्राफर लपलाय का? तर दुसऱ्या युजरने एवढं एक्स्पोज होऊ नकोस, असा सल्लाही दिला होता. प्रियांकाने रोमँटिक कॅप्शन देत हा फोटो शेअर तर केला खरा, पण प्रियांका-निकवर पाळत ठेवून फोटो काढणारा फोटोग्राफर कोण याचीही उत्सुकता लागली होती. अखेर यावर प्रियांकानेच उत्तर दिलं.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI