मध्यरात्रीपासून पुणे शहर पूर्णपणे सील, महापालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात येणार (Pune 7 Days Curfew) आहे.

मध्यरात्रीपासून पुणे शहर पूर्णपणे सील, महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा (Pune 7 Days Curfew) ओलंडला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्यात निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पुण्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे (Pune 7 Days Curfew) महानगरपालिका क्षेत्र हे संक्रमणशील (Containment Zone) म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, महापालिका आणि शासकीय सेवा सुरु राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्र सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस म्हणजे 27 एप्रिल 2020 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही व्यक्तींना पुणे शहर आणि इतर परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे.

या कर्फ्यूदरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

जो कोणी या कर्फ्यूचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केलं (Pune 7 Days Curfew) आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कर्फ्यू

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरही कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांनाही ठराविक वेळ ठरवून दिला आहे. येत्या 27 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

सोलापुरातही संचारबंदी

सोलापुरातही कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 23 एप्रिलपर्यंत पूर्ण संचारबंदी करण्यात येणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही उद्योगाला परवानगी दिली जाणार नाही. तसेच शहरात सकाळी 6 ते 11 पर्यंत दूध विक्री करता येणार आहे. त्याशिवाय पेट्रोल पंपही सकाळी 11 पर्यंत सुरु राहणार आहेत, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा (Corona Virus Maharashtra) ओलंडला आहे. आज (19 एप्रिल) राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 200 झाली आहे. तर दुसरीकडे आज राज्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या ही 223 वर पोहोचली आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांचा आकडा 500 च्या पार गेला आहे. पुणे शहरात आतापर्यंत 563 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 48 जण कोरोनाग्रस्त आहेत.

Published On - 11:38 pm, Sun, 19 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI