पुण्यात कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे करायचे? दीपक म्हैसेकरांच्या महत्त्वाच्या सूचना

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुण्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हा प्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत (Funeral ceremony instruction of Corona Patient in Pune).

पुण्यात कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे करायचे? दीपक म्हैसेकरांच्या महत्त्वाच्या सूचना

पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुण्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हा प्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत (Funeral ceremony instruction of Corona Patient in Pune). यावेळी त्यांनी सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. तसेच विभागातील कोरोनावरील उपाययोजना, औषधोपचार, वैद्यकीय सामग्री, अन्नधान्य पुरवठा अशा विविध बाबींचाही आढावा घेतला.

दीपक म्हैसेकर म्हणाले, “कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णावर गॅस अथवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत. कारण कोरोना विषाणू बाधित मृत व्यक्तीमुळे विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कोरोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कोणत्याही नातेवाईकाला कोरोनाबाधित शव ताब्यात मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधित शव दफन करावयाचे असल्यास शहरापासून दूर अशा ठिकाणी 6 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये निर्रजंतूक लिक्वीड टाकूण हे शव प्लॅस्टीकच्या दोन बॅगात घालून त्याचे दफन करावे.”

“14 एप्रिलनंतर केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊन वाढवणार की टप्प्याटप्प्याने यामध्ये शिथिलता आणणार याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नाही. त्यामुळे पुणे विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल. याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशाही सूचना डॉ.म्हैसेकर यांनी केल्या.

दीपक म्हैसेकर म्हणाले, “कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णाची कोविड केअर, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय विभागणी करुन रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे उपचारावरील ताण कमी होऊन रुग्णांची सौम्य ते गंभीर अशा स्तरावर विभागणी होईल आणि उपचार करण्यास सुलभता येईल. विभागांतर्गत सर्व जिल्ह्यातील औषध पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषधांचा साठा याबाबत माहिती घेतली आहे.”

विभागात अडकलेले प्रवासी, मजूर यांची अन्न व निवासाची व्यवस्था करण्याच्या आणि बेघर नागरिकांचीही नाईट शेल्टर अथवा शाळेत निवारा व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साखर कारखाना क्षेत्रातील मजूर स्थलांतरीत होणार नाही, याचीही दक्षता घेऊन त्यांचीही निवास व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हयातील उपबाजार, आठवडी बाजार पूर्णत: बंद केले आहेत. आजवर आवक झालेल्या मालाची विक्री होईपर्यंतच भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करुन द्यावा. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधे, लिक्वीड सोप, साबण, तेल, दूध यांचा सुरळीत पुरवठा ठेवण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत, असंही म्हैसेकर यांनी नमूद केलं.

ज्यांचं स्वास्थ्य उत्तम असून उच्च रक्तदाब, मधुमेह अथवा कोणताही गंभीर आजार नाही, अशा ‘आशा’वर्कर, अंगणवाडी सेविका आणि सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासणीची कामे करुन घेण्याबाबत सूचना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नॉट रिचेबल बड्या नेत्याला फडणवीसांनी तात्काळ शोधलं होतं, अजित पवारांचा उल्लेख टाळत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करा, आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

Corona : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6761 वर, तर 206 जणांचा मृत्यू

Funeral ceremony instruction of Corona Patient in Pune

Published On - 9:15 pm, Fri, 10 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI