Pune Corona | पुण्यात दिवसभरात 205 नवीन कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या 5,899 वर

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 5 हजार 899 वर गेली आहे. आज दिवसभरात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune Corona | पुण्यात दिवसभरात 205 नवीन कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या 5,899 वर
Follow us
| Updated on: May 25, 2020 | 9:46 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 205 नवीन (Pune Corona Cases Update) कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 5 हजार 899 वर गेली आहे. आज दिवसभरात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 276 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. काल (24 मे) रात्री 9 वाजेपासून ते आज सायंकाळी (25 मे) 4 वाजेपर्यंतची ही (Pune Corona Cases Update) आकडेवारी आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 190 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर उर्वरित 15 हे पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. गेल्या 18 तासात 200 पेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाल्याने पुणेकरांची चिंता कायम आहे.
लॉकडाऊन चे निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. चाचण्याही मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. मात्र, सातत्याने वाढणारी मृतांची संख्या चिंतेत भर टाकणारी आहे.

जनता वसाहतीत रुग्ण संख्या 50 वर

पुण्यातील जनता वसाहतमध्ये नवीन चार कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत आतापर्यंत 50 बाधित रुग्ण झाले आहेत. तर चार बाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे (Pune Corona Cases Update). सिंहगड परिसरात आतापर्यंत 95 कोरोनाबाधित रुग्ण असून 57 जण क्वारंटाईन आहेत. मात्र, या परिसरात आज स्वॅब घेण्याचे काम थांबवण्यात आलं आहे.  लॅब बंद असल्याचं कारण सांगितले जात असल्याने रुग्णांना फटका बसण्याची भीती आहे.

जनता वसाहत ही पुण्यातील धारावी म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत या वसाहतीला थोपवून ठेवलं होतं. मात्र, कोरोना अभेद्य भिंत भेदत शिरकाव केला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वसाहतीतील 10 गल्ल्या सील केल्या आहेत.  तर, इतर भागात आणखी गल्या सील करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. परिसर निर्जंतुक केला जात आहे.
जनता वसाहत एकूण 110 गल्ल्या असून सर्वत्र उपयोजना राबवल्या जात आहे. पालिकेच्या नवीन नियमावलीनुसार जनता वसाहत प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. सुरुवातीला या वसाहतीतील एक रुग्ण डायलिसिससाठी रुग्णालयात गेला होता आणि या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यातच मेडिकलमध्ये काम करणारे पाच जण कोरोनाबाधित आढळून (Pune Corona Cases Update ) आले आहेत.

पुणे शहरात दिवसभरात 399 कोरोनाबाधित नवे रुग्ण

पुणे शहरात सोमवारी तब्बल 399 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंतचे एका दिवसातील ही विक्रमी नवीन रुग्णवाढ आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या रुग्णांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. पाच हजार 181 वर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली. तर दिवसभरात दहा बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळं आतापर्यंत 264 बाधित रुग्ण दगावलेत. तर दिवसभरात 175 रुग्ण डिस्चार्ज झाले. आतापर्यंत 2735 रुग्ण डिस्चार्ज झाले असून ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात सध्या 2182 ॲक्टिव रुग्ण असून 179 क्रिटिकल आणि 44 व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळं मृत्यूला कसं रोखायचं हा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य विभागाला भेडसावत आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापुरात कोरोनाबाधितांचा आकडा 409 वर, दहा दिवसात 378 रुग्णांची नोंद

Non Stop LIVE Update
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.