Corona : पुणे विभागात 518 कोरोनाबाधित, आतापर्यंत 47 जणांचा बळी

पुण्यात सध्या 463 कोरोनाबाधित आहेत. त्यापाकी पुणे शहरात 389, पिंपरी-चिंचवडमध्ये 46, ग्रामीण आणि कॅन्टोमेंटमध्ये 28 कोरोनाचे रुग्ण आहेत.

Corona : पुणे विभागात 518 कोरोनाबाधित, आतापर्यंत 47 जणांचा बळी
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 6:44 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस (Pune Corona Update) वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांच्या आणि कोरोना बळींच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. पुणे विभागात सध्या 518 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 47 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (Pune Corona Update) यांनी दिली.

पुणे विभागात कुठे किती मृत्यू?

  • पुणे – 44
  • सातारा – 2
  • सोलापूर – 1

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे. पुण्यात सध्या 463 कोरोनाबाधित आहेत. त्यापाकी पुणे शहरात 389, पिंपरी-चिंचवडमध्ये 46, ग्रामीण आणि कॅन्टोमेंट परिसरात 28 कोरोनाचे रुग्ण आहेत.

पुण्यातील 378 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांपैकी 42 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे विभागात साताऱ्यात 11 रुग्ण आढळले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला घरी सोडण्यात आलं.

सोलापूरमध्ये सध्या कोरोनाचे 12 रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगलीत 26 पैकी 25 जणांना घरी सोडण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 6 कोरोनाचे रुग्ण (Pune Corona Update) आहेत.

पुणे विभागात 68 रुग्ण हो कोरोना आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 11 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा वाढता विळखा पाहता दोन्ही महापालिकेने फ्यु क्लिनिकची संख्या वाढवली आहे, असं ही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगतिलं.

राज्यातील स्थिती काय ?

महाराष्ट्रात 165 नवीन ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 3081 वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत गेल्या काही तासात 107 नव्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2003 वर गेला आहे. तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य झाले आहे. (Maharashtra Mumbai Corona Patients Update)

मुंबईमध्ये 107, तर पुण्यात 19 नव्या ‘कोरोना’ग्रस्तांची नोंद झाली आहे. त्याशिवाय नागपूरमधील 11, ठाण्यातील 13 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड (पुणे) आणि मालेगाव (नाशिक) मध्ये प्रत्येकी चार नवे रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय, नवी मुंबई आणि वसई-विरार (पालघर) मध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदनगर आणि पनवेल (रायगड) मध्ये प्रत्येकी एक नवा ‘कोरोना’ रुग्ण सापडला आहे. तर औरंगाबादेत तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Pune Corona Update

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण

Corona : सोलापुरात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Corona : औरंगाबादेत गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर

बारामतीतील रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त, हिंगोलीतील पहिल्या रुग्णाचे रिपोर्टही निगेटिव्ह

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.