Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

पुणे विभागात कोरोनामुळे जीव गमावल्यांची संख्या आता 127 वर पोहोचली आहे. पुण्याचा कोरोना मृत्यू दर 5.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Nupur Chilkulwar

|

May 05, 2020 | 8:23 PM

 पुणे : पुण्यात आज दिवसभरात 99 नवे कोरोना रुग्ण आढळून (Pune Corona Virus) आले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोना रुग्णांची संख्या आता 2,202 वर येऊन पोहोचली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. आज दिवसभरात पुण्यात चार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 119 वर पोहोचला आहे. तर, पुणे विभागात 543 जण कोरोनावर मात करत बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, पुढील आठ ते दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती दीपक म्हैसेकर (Pune Corona Virus) यांनी व्यक्त केली.

पुणे विभागात कुठे किती कोरोनाग्रस्त?

  • पुणे – 1944
  • पिंपरी-चिंचवड – 133
  • कंटोनमेंट – 50
  • ग्रामीण – 45

पुणे शहरात सध्या 1944 कोरोना रुग्ण आहेत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 133 कोरोनाग्रस्त आहेत. इतर कोरोना रुग्ण  हे ग्रामीण भागातील आहेत. पुणे विभागात कोरोनामुळे जीव गमावल्यांची संख्या आता 127 वर पोहोचली आहे. कोरोना मृत्यू दर 5.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, 93 रुग्ण अति गंभीर स्थितीत आहेत.

आठ ते दहा दिवसांत कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

पुढील आठ ते दहा दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी भीती दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही रोज 800 ते 1000 नमुण्यांची चाचणी करण्याचे नियोजन करत आहोत. शिवाय, ससून रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर प्लाझ्मा थेरेपीला परवानगी मिळाली आहे. एका रुग्णाने ब्लड डोनेटला परवानगी दिली आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याची प्रक्रिया (Pune Corona Virus) सुरु होईल.

पुणेकरांनी प्रशासनाची मदत करावी : दीपक म्हैसेकर

कोरोनाच्या लढाईत आपले तीन लढवय्ये पोलीस आणि मनपा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने त्या तिघांनाही मी श्रध्दांजली वाहतो. या बलिदानातून आपण काहीतरी शिकावं आणि प्रशासनाची मदत करावी. सोशल डिस्टन्स पाळावं, अशी विनंती म्हैसेकर यांनी पुणेकरांना केली. चार सनदी अधिकाऱ्यांवर प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे. कोरोनाग्रस्त भागातील लोकसंख्या शिफ्ट केली जात आहे. त्यांची तपासणी केली जात आहे, त्यांना मास्क पुरवले जात आहेत.

1200 व्यक्ती असेल, तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेन सोडणार : दीपक म्हैसेकर

परप्रांतीय पाच जिल्ह्यातून स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया पाठवली जाणार आहे. कोणत्याही पदवी असलेल्या डॉक्टरचं प्रमाणपत्र लागेल. फक्त कोविड संदर्भातील लक्षणांची तपासणी करायची आहे. 1200 व्यक्ती असेल, तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेन सोडायला आम्ही तयार आहे. मात्र, डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन राहील, मधे कुठेही गाडी थांबणार नाही. तसेच, त्यांना सोशल डिस्टन्सचं पालन करुन, कोरोना संदर्भात योग्य काळजी घेऊन रवाना (Pune Corona Virus) करण्यात येईल.

संबंधित बातम्या :

दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही? पुण्याच्या रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

Pune corona Update | पुण्यात दुपारपर्यंत आणखी तिघांचा मृत्यू, पिंपरीत 2 लहान मुलांसह 9 नवे कोरोना रुग्ण

दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये

पुण्यातील स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार, 15 हजार नागरिकांचा समावेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें