Pune Corona | पुण्यात दिवसभरात पाच जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 2,201 वर

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (5 मे) 79 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 2,201 वर येऊन पोहोचली आहे.

Pune Corona | पुण्यात दिवसभरात पाच जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 2,201 वर

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी (5 मे) 79 नवीन कोरोना (Pune District Corona Update) बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 2,201 वर येऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता (Pune District Corona Update) कोरोनामुळे 120 जणांचा बळी गेला आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीत दिवसभरात 65 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1,943 वर पोहोचला आहे. पुण्यात दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृत्युंची संख्या 111 वर पोहोचली. तर 76 रुग्ण अतिगंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात सध्या 1,297 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

पुण्यात तीन पुरुष कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका अकरा वर्षीय मुलाचा, 31 वर्षीय तरुणाचा आणि 63 वर्षे ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.

पुण्यात कुठे कोरोनाबाधिताचा मृत्यू?

– 31 वर्षीय येरवडा येथील पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा 4 मे रोजी सव्वासात वाजता मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनासह इतरही व्याधी असल्याचं स्पष्ट झालं (Pune District Corona Update) आहे.

– वारजे माळवाडी येथील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. या मुलाला देखील कोरोनासह इतर काही व्याधी होत्या. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्याला झटके येत होते, उपचार सुरु असतानाच त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि आज त्याचा मृत्यू झाला.

– 4 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता भवानी पेठेतील एका 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. 4 तारखेला रात्री सव्वा दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनासह इतर व्याधी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर

महाराष्ट्रात आज (5 मे) कोरोनाच्या 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 झाली आहे. आज राज्यात 354 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 2 हजार 819 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Pune District Corona Update

Published On - 12:01 am, Wed, 6 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI