AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी,19 कंपन्यांमध्ये उत्पादनही सुरु

कोरोना प्रादुर्भाव असलेल्या रेडझोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना देण्याचा निर्णय सरकारने दिला. त्यामुळे राज्यातील आर्थिक चाके फिरु लागली आहेत.

पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी,19 कंपन्यांमध्ये उत्पादनही सुरु
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 29, 2020 | 4:11 PM
Share

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस  (Pune District Industries Get Permission) वाढत चालला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई-पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भाव असलेल्या रेडझोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना देण्याचा निर्णय सरकारने दिला. त्यामुळे राज्यातील आर्थिक चाके फिरु लागली आहेत. अटीशर्तींसह उद्योगांना सुरु करण्यास (Pune District Industries Get Permission) परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी महानगरपालिकांची हद्द वगळता अन्य जिल्ह्यातील इतर भागांमध्ये 516 उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील 460 आणि अन्य क्षेत्रातील 56 उद्योगांचा समावेश आहे. कुरकुंभ, जेजुरी, इंदापूर आणि पाटस याभागातील एमआयडीसीत हे उद्योग सुरु करण्यात आले आहेत.

दूध, दुग्धजन्य अन्नपदार्थ, औषध आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मितीही सुरु झाली आहे. तसेच, जीवनावश्यक 460 उद्योगधंदे सुरु झाले आहेत. 56 उद्योगांपैकी 19 उद्योगांनी उत्पादनही सुरु केले आहे (Pune District Industries Get Permission). त्याच बरोबर पुणे विभागातील इतर चार जिल्ह्यातही परवानगी उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. नियम आणि अटीशर्तीनुसार, उद्योगधंदे सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

राज्यातील स्थिती काय?

राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे तर पुण्यातील रुग्णांची संख्या 1,100 पेक्षाही जास्त झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे (Pune District Industries Get Permission).

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 6169 374 244
पुणे (शहर+ग्रामीण) 1102 125 79
पिंपरी चिंचवड मनपा 72 3
ठाणे (शहर+ग्रामीण) 389 36 6
नवी मुंबई मनपा 142 3
कल्याण डोंबिवली मनपा 153 3
उल्हासनगर मनपा 3
भिवंडी निजामपूर मनपा 14
मीरा भाईंदर मनपा 123 2
पालघर 41 1 1
वसई विरार मनपा 123 3
रायगड 22 5
पनवेल मनपा 44 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 24 2
मालेगाव मनपा 171 12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 25 3
जळगाव 40 1 9
नंदूरबार 11 1
सोलापूर 68 5
सातारा 32 3 2
कोल्हापूर 12 2
सांगली 27 27 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 90 14 6
जालना 2
हिंगोली 15 1
परभणी 1
लातूर 12 8 1
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 3
अकोला 34 1 1
अमरावती 28 7
यवतमाळ 71 8
बुलडाणा 21 8 1
वाशिम 1 1
नागपूर 135 12 1
भंडारा 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 25 2
एकूण 9318 1388 400

संबंधित बातम्या :

कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

लॉकडाऊनमुळे पुण्यात रस्ते अपघात घटले, एप्रिलमध्ये केवळ 3 अपघात, बळींचा आकडा…

पुण्यात कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा

गुड न्यूज! पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!