AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी, पुण्यातील ज्येष्ठांना मोठा आधार

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्यात परवानगी देण्यात आली आहे. (Pune Lockdown Housekeeper Women Rejoin Work)

घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी, पुण्यातील ज्येष्ठांना मोठा आधार
| Updated on: May 19, 2020 | 9:45 PM
Share

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात (Pune Lockdown Housekeeper Women Rejoin Work) आला आहे. राज्य सरकारने नुकतंच लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर आता पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरासाठी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्यात परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलासा दिला आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना ही परवानगी देण्यात आली. मात्र केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरील महिलांना ही परवानगी आहे. तसेच सोसायटीला कोरोना संदर्भात योग्य त्या दक्षतेच्या उपायोजना राबवणं बंधनकारक आहे, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

कंटेनमेंट झोन बाहेरील पुणे पूर्वपदावर

पुण्यातील काही प्रतिबंधित क्षेत्रात आणि बाहेरील भागाची पुनर्रचना केली. चौथ्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. पुण्याच्या 330 चौरस किलोमीटरपैकी 10.48 चौरस किलोमीटर प्रतिबंधित असणार आहे. काही भाग वगळण्यात आले असून तर काही भागांचा नव्याने समावेश केला आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानही उघडली जाणार आहे. तसेच काही मार्गांवर पीएमपीएलही धावणार आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोन बाहेरील पुणे पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

नवीन नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्राचा काही भाग वगळण्यात आला आहे. तर काही भाग नव्याने प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यानुसार 69 प्रतिबंधित क्षेत्रापैकी आता 64 कंटेनमेंट झोन असतील. पाच कंटेनमेंट झोन प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत.

पूर्वीच्या 69 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 24 भागात एकही नवीन बाधित रुग्ण आढळला नाही. दहा दिवसात नवीन रुग्ण न आढळल्यानं हा भाग रेड झोनमधून वगळला आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी घेतलेल्या दक्षतेमुळे त्यांना दिलासा मिळाला. तर रुग्ण आढळलेले 19 नवीन झोन वाढवण्यात आले आहेत. तर चार झोनचं क्षेत्र कमी झालं आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दुकाने उघडणार

तसेच पुण्याच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानही उघडली जाणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, सिंहगड रोड, टिळक रोड दुकान उघडण्यास परवानगी दिली. मात्र कोणतं दुकान कोणत्या वारी आणि केव्हा उघडायचं, याबाबतची नियमावली ठरवली जाणार आहे.

छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकानं, शेतीसंबंधी दुकाने उघडण्यास परवानगी आहे. तर शहरातील महत्त्वाच्या भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान पुण्यात आज दिवसभरात आठ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 207 वर पोहोचला आहे. पुण्यात आज दिवसभरात 149 नवे रुग्ण आढळले आहे. तर दिवसभरात 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यादत 1630 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 156 क्रिटिकल रुग्ण आणि 43 रूग्ण व्हेंटिलेटरवर (Pune Lockdown Housekeeper Women Rejoin Work)  आहेत.

संबंधित बातम्या : 

पुण्यात 338 ग्रामपंचायतींकडून ‘रोहयो’ची कामे, तर 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु

पिंपरी चिंचवडमध्ये एका दिवसातील सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.