AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाचा विळखा वाढताच, 13 जणांना लागण

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 663 वर पोहोचला आहे. तर 193 जणांचा मृत्यू झाला (Pune Janta Vasahat Corona Patient) आहे.

पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाचा विळखा वाढताच, 13 जणांना लागण
| Updated on: May 18, 2020 | 12:16 AM
Share

पुणे : महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत (Pune Janta Vasahat Corona Patient) आहे. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 663 वर पोहोचला आहे. तर 193 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर देशापेक्षा ही जास्त आहे. गेल्या दोन महिन्यापासून कोरोनानं पुण्याला विळखा घातला आहे. कोरोनापासून अभेद्य असलेल्या जनता वसाहतीत घुसखोरी केली आहे. एवढंच नाही तर औषध विक्रेत्यांना ही त्यानं कवेत घेतलं. त्यामुळे पुणेकरांचा धोका आणखी वाढला आहे.

पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाने शिरकाव केला (Pune Janta Vasahat Corona Patient) आहे. या कॉलनीतील 13 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे 50 पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून अभेद्य असलेली तटबंदी भेदली आहे. कोरोना घुसखोरीनं रहिवासी चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जनता वसाहतीत शनिवारी पाच जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री पुन्हा आठ जणांना बाधा झाली. त्यामुळे आता जनता वसाहतीत तब्बल 13 जणांना लागण झाली.

जनता वसाहत ही तब्बल शंभर एकरात पसरली आहे. पर्वतीच्या पायथ्याला आणि खडकवासला कॅनलच्या किनाऱ्यावर ही वसाहत आहे. या ठिकाणी 15 ते 20 हजार झोपड्या आहेत. या झोपड्यात 60 ते 65 हजार लोकसंख्या आहे. छोटे रस्ते, गल्ली बोळा, दाटीवाटीने घराला घर लागून झोपड्या, त्यातच सार्वजनिक शौचालयानं या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासन जनता वसाहत सील करण्याचा विचार करत आहे.

जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने हे संकट गडद झालं आहे. त्यातच मेडिकल क्षेत्रालाही ही कोरोनानं विळखा घातला. सदाशिव पेठेत घाऊक औषधाच्या दुकानात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. एकाच दुकानातील 37 कर्मचाऱ्यांना बाधा झाली तर आतापर्यंत दोन मालकासह 42 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत.

या ठिकाणाहून शहरात तब्बल 350 ठिकाणी औषध पुरवठा केला जात होता. त्यामुळे औषध दुकानं हे कोरोना प्रसाराचे केंद्र बनण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून घाऊक औषध विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे संघटनेने नियमावली बनवली आहे.

कोरोना प्रादुर्भाव भुसार मार्केटमध्येही झाला आहे. व्यापाऱ्यांसह आठ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे मंगळवारपासून भुसार बाजार अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दि पूना मर्चंट्स चेंबर असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी निर्णय घेण्यात आला आहे. अनिश्चित बंद झाल्यास एक ते दोन टक्के दरवाढ होण्याची भीती आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आता ठराविक क्षेत्र आणि व्यक्तींपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. तर तो उंच टॉवरपासून झोपडीपर्यंत पसरला आहे. एवढंच नाही तर त्यांना आता मेडिकल विक्रेत्यांना विळखा घातला आहे. त्याचबरोबर जनता वसाहतची अभेद्य भिंत छेदली आणि भुसार मार्केट ही पोखरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची तीव्रता वाढत असल्यानं नियंत्रण मिळवण सध्यातरी कठीण झाले (Pune Janta Vasahat Corona Patient) आहे.

संबंधित बातम्या : 

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढताच, बाधितांचा आकडा 3,795 वर

पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, जनता वसाहतीत 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.