पुण्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शिथिलता, दुकानांची वेळ ठरली, दारु दुकानांबाबतही निर्णय जाहीर

पुण्यात 13 ते 18 या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. दुकानांची वेळ जाहीर केली आहे. Pune lockdown relaxation

पुण्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शिथिलता, दुकानांची वेळ ठरली, दारु दुकानांबाबतही निर्णय जाहीर

पुणे : पुण्यात 13 ते 18 या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. नवे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणेकरांना दिलासा दिला आहे. कारण उद्या रविवार 19 जुलैपासून लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी उद्याच्या रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. तर सोमवारपासून दुकानांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर दुसरीकडे 23 जुलैपर्यंत दारु दुकानं बंदच राहणार आहेत. (Pune lockdown relaxation)

दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दुकानांसमोर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात विचारविनीमय सुरु होता. त्यानंतर ही शिथिलता देण्यात आली.  नियमांचे पालन करुन हळूहळू शिथिलता देण्यात येईल, असं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं. (Pune lockdown relaxation)

पिंपरी चिंचवड

-पिंपरी चिंचवडमध्येही शिथीलता देण्यात आली आहे. रविवारी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना विक्री करण्यास मुभा आहे.

-19 जुलै म्हणजे उद्या शहरात गर्दी होईल म्हणून सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान ही दुकानं खुली राहतील.

-तर नंतर अत्यावश्यक वस्तूची विक्री करण्यास 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच मुभा असेल.

पुण्यात दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जाहीर केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. पुणे शहरात मंगळवार 14 जुलै मध्यरात्री एक वाजता सुरु झालेला लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत कायम असेल. पुणे शहरातील रस्ते, पेठांचे भाग पोलिसांनी बंद केले असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे (Pune Lockdown Second Phase).

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत.

13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत.

Pune lockdown relaxation

संबंधित बातम्या 

Pune Lockdown | पुणेकरांसाठी दिलासा! दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ वाढण्याची शक्यता  

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा 

Published On - 4:56 pm, Sat, 18 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI