गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळाली, पठ्ठ्याने पुण्यात ‘असा’ राग काढला!

अनिश बेंद्रे

|

Updated on: Aug 26, 2020 | 12:27 PM

गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळून गेल्याच्या रागातून अहमदाबादच्या तरुणाने पुण्यात 70 रिक्षाचालकांचे स्मार्टफोन चोरले

गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळाली, पठ्ठ्याने पुण्यात 'असा' राग काढला!

पुणे : गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळून गेल्याने अहमदाबादच्या पठ्ठ्याने पुण्यात वेगळ्याच पद्धतीने आपला राग काढला. कात्रज, कोंढवा आणि कॅम्प परिसरात रिक्षा चालवणाऱ्या थोड्या-थोडक्या नाही, तर तब्बल 70 रिक्षाचालकांचे स्मार्टफोन आरोपीने लांबवले. केसचा उलगडा झाल्यावर पोलीसही हैराण झाले. (Pune Man steals phones from 70 rickshaw drivers because his girlfriend run away with an auto driver)

अहमदाबादमध्ये आधी एका रेस्टॉरंटचा मालक असलेल्या आसिफ ऊर्फ भुराभाई आरिफ शेख याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. 36 वर्षांच्या या पठ्ठ्याने पुण्यात रिक्षाचालकांचे मोबाईल चोरुन धुमाकूळ घातला होता. पण ही चोरी आर्थिक उद्देशाने नव्हती, तर सूडभावनेतून होती. ‘पुणे मिरर’ वेबसाईटवर यासंदर्भात वृत्त आहे.

आरोपी आसिफ कॅम्पमधील न्यू मोदीखाना येथे राहत होता. त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

का उगवला सूड?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केवळ ऑटोरिक्षा चालकांना लक्ष्य केले होते. कारण प्रेयसी त्याचा पैसा लुबाडून पुण्यातील एका रिक्षाचालकासह पळून गेली होती. त्यामुळे त्यांना (रिक्षाचालक) होणारा त्रास आरोपीला पहायचा होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेख जून 2019 मध्ये आपल्या पालकांच्या इच्छेविरुद्ध अहमदाबाद येथील रेस्टॉरंट विकून 27 वर्षीय गर्लफ्रेंडसह पुण्यात आला होता. त्याला तिच्याबरोबर लग्न करुन नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. नवीन शहरात नव्याने आयुष्य सुरु करायची त्याची इच्छा होती.

दुर्दैव म्हणजे, दोन दिवसातच त्याची प्रेयसी त्याचा पैसा अडका घेऊन गुजरातला परतली. शेख तिच्या मागे गेला, पण ती सापडेपर्यंत उशीर झाला होता. तिने पुण्यातील एका रिक्षाचालकाशी लग्न केले होते. दुखावलेल्या मनाने तो पुण्याला परतला. कोंढव्यातील आपल्या दूरच्या नातेवाईकासोबत त्याने छोटीमोठी कामे करण्यास सुरुवात केली.

पुण्यात आल्यावरही स्थानिक रिक्षाचालकांविषयीची कटुता त्याच्या मनात कायम होती. त्याने कात्रज, कोंढवा आणि कॅम्प भागात रिक्षाने प्रवास करण्यास सुरुवात केली. ड्रायव्हरचे लक्ष विचलित केल्यावर तो त्यांचे स्मार्टफोन चोरी करायचा. (Pune Man steals phones from 70 rickshaw drivers because his girlfriend run away with an auto driver)

आरोपी शेखने पोलिसांना सांगितले की, फोन चोरी केल्याने त्याला एक प्रकारचा असुरी आनंद मिळायचा. कारण एक रिक्षाचालकच त्याच्या तुटलेल्या प्रेम प्रकरणाला आणि वाईट आर्थिक परिस्थितीला जबाबदार होता. मात्र आश्चर्य म्हणजे, ज्या तरुणीने त्याला फसवले, तिच्याविषयी त्याच्या मनात बिलकुल अढी नव्हती. चौकशी दरम्यान त्याने वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी वापरुन पुणे शहरात अशा प्रकारच्या 70 चोऱ्या केल्याचे कबूल केले.

आरोपी आसिफ पॉश आणि चकचकित रिक्षा हेरायचा. तातडीने कॉल करण्याच्या नावाखाली किंवा चालकाचे लक्ष वळवून तो त्यांचा स्मार्टफोन चोरुन न्यायचा. त्याचा अत्याधुनिक पोशाख आणि भाषा पाहून कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही.

बर्‍याच प्रकरणांमध्ये, त्याने रिक्षाचे भाडेही दिले आणि नंतर तो महागड्या फोन्ससह गायब झाला. एखादा महागडा स्मार्टफोन असेल, तरच तो ड्रायव्हरला लक्ष्य करत असे. त्याच्यासाठी सापळा रचूनही तो कित्येक महिने पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

(Pune Man steals phones from 70 rickshaw drivers because his girlfriend run away with an auto driver)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI