AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील मंचरमध्ये ‘कोरोना’ बचावासाठी शक्कल, ‘छत्री पॅटर्न’ नेमका काय?

पुणे जिल्ह्यातील मंचर गावामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केरळच्या धर्तीवर अनोखा छत्री पटर्न राबवण्यात (Umbrella Pattern in Pune Manchar Village) आला. 

पुण्यातील मंचरमध्ये 'कोरोना' बचावासाठी शक्कल, 'छत्री पॅटर्न' नेमका काय?
| Updated on: Jun 07, 2020 | 12:35 PM
Share

पुणे : देशाप्रमाणे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला (Umbrella Pattern in Pune Manchar Village) आहे. यासाठी सरकारकडून विविध उपाययोजनादेखील अंमलात आणल्या जात आहे. तसेच शासनाकडून सतत सोशल डिस्टन्स पाळा असे आवाहन केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर गावामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केरळच्या धर्तीवर अनोखा छत्री पटर्न राबवण्यात आला.

हा छत्री पॅटर्न राबवण्यासाठी मंचरमध्ये ग्रामस्थांच्या घरी जाऊन आवाहन केलं जातं आहे. मंचरमधील हा छत्री पॅटर्न सध्या चांगला व्हायरल झाला आहे. बरं या पॅटर्नमुळे आपोआप सोशल डिस्टन्सिंग ही राखलं जातं आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचरमधील महिलांनी छत्री पॅटर्नचं चॅलेंज स्विकारलं आहे. इतकंच नव्हे तर अनेक महिला रस्त्यावर उतरुन, घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन करत आहेत. अनेकांचे सोशल मीडियावरील फोटो आणि रस्त्या-रस्त्यावरील दृश्य पाहून हे छत्रीचं खूळ का चढलंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मंडळींनी सोशल डिस्टंसिंगसाठी ही शक्कल लढवली आहे.

लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाली अन मंचर गावात सर्व ठिकाणी गर्दी वाढू लागली. मग सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी गावचे सरपंच दत्ता गांजाळेंनी केरळच्या धर्तीवर ही संकल्पना राबवायचं ठरवलं. पण उन्हात छत्री घेऊन फिरायचं म्हटलं की अनेकांनी नाकं मुरडली. मग स्वतः सरपंचानीच गावात छत्री घेऊन प्रबोधन सुरु केलं.

मंचर गावातील सरपंचांची ही संकल्पना महिलांना खूपच आवडली. मग काय महिलांनी ही संकल्पना डोक्यावर घेतली. अन् घरोघरी जाऊन छत्री पॅटर्न पोहचवण्यास सुरुवात झाली. त्यात सेल्फी विथ अम्ब्रेलाची भर पडली. अन अबाल-वृध्दांच्या स्टेट्सवर छत्रीसह फोटो झळकू लागले. महिलांनीच हा उपक्रम हाती घेतल्याने पुरुषांना देखील यात सहभाग घेण्याविना पर्यायच उरला नव्हता.

छत्री पॅटर्न नेमका काय?

  • केरळमधील एका ठाणीरमुक्कोम या छोट्याशा गावात हा छत्री पॅटर्न राबवला जात आहे.
  • छत्रीचा परिघ हा मोठा असतो.
  • त्यामुळे जर दोन व्यक्ती छत्री घेऊन समोरासमोर आल्या तरी छत्रीमुळे तीन फुटापर्यंत सोशल डिस्टन्सिंग राखलं जातं.
  • कोरोनामुळे गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • त्यामुळे हा छत्री पॅटर्न चांगलाच फायदेशीर ठरला.
  • विशेष म्हणजे यामुळे लोकांना लॉकडाऊन शिथीलतेचा फायदाही घेता येत आहे.
  • तसेच गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंगही पाळले जात आहे.

(Umbrella Pattern in Pune Manchar Village)

संबंधित बातम्या : 

मुंबई-पुण्यात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरु, पुण्यातील सोसायट्यांमध्ये विक्रेत्यांना विरोध

पुण्यात चिकन-मटणचे दर घसरले, मांसाहारींच्या रांगा

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ