2019 अखेरपर्यंत पुण्यात मेट्रो धावणार : पंतप्रधान मोदी

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या कामाचं भूमीपूजन झालं. दोन वर्षांपूर्वी पुणे मेट्रोच्या कामाचं मोदींनी भूमीपूजन केलं होतं. हे काम सध्या वेगाने सुरु आहे. त्यामुळे पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत पुणे मेट्रो रुळावर येईल, अशी अपेक्षा मोदींनी पुण्यात बोलताना व्यक्त केली. पुण्यातील भाषणाची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. छत्रपती शिवाजी […]

2019 अखेरपर्यंत पुण्यात मेट्रो धावणार : पंतप्रधान मोदी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या कामाचं भूमीपूजन झालं. दोन वर्षांपूर्वी पुणे मेट्रोच्या कामाचं मोदींनी भूमीपूजन केलं होतं. हे काम सध्या वेगाने सुरु आहे. त्यामुळे पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत पुणे मेट्रो रुळावर येईल, अशी अपेक्षा मोदींनी पुण्यात बोलताना व्यक्त केली.

पुण्यातील भाषणाची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांची कर्मभूमी आणि बाल गंगाधर टिळक, गोपालकृष्ण गोखले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मभूमीला माझा प्रणाम, असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पुणे आणि महाराष्ट्रातील जनतेने मला खूप प्रेम दिलं आहे. तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी इथे जमलात, त्याबद्दल आभार, असंही मोदी म्हणाले.

“मेट्रोमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. या सरकारकडून पायाभूत सुविधांवर भर दिला जातोय. मागच्या सरकारने पायाभूत सुविधांवर पैसा खर्च केला नाही. अटलजींनी त्यांच्या कार्यकाळात यावरच लक्ष केंद्रीत केलं होतं. पण पुन्हा त्यांचं सरकार आलं नाही. अटलजींचं सरकार पुन्हा आलं असतं तर महाराष्ट्राचा विकास वेगाने झाला असता,” असंही मोदींनी सांगितलं.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील हा माझा चौथा कार्यक्रम आहे. आजही हजारो कोट्यवधी रुपयांच्या योजनांचं भूमीपूजन करण्यात आलंय. मेट्रो प्रकल्पांसोबतच गरीबांना घर देणाऱ्या योजनेचाही यामध्ये समावेश आहे.

पुण्यातील तिसरा मेट्रो प्रकल्प हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेचं भूमीपूजन केलंय. आठ हजार कोटी रुपये खर्च करुन तयार होणाऱ्या या प्रकल्पामुळे देशातील सर्वात व्यस्त आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडीला मोठा फायदा होणार आहे.

दोन वर्षांपूर्वीच पुण्यात मेट्रोच्या कामाचं भूमीपूजन केलं होतं आणि ते काम सध्या वेगाने सुरु आहे. अपेक्षा आहे, की पुढच्या वर्षी अखेरपर्यंत ही 12 किमीची मेट्रो रुळावर असेल. आता शिवाजीनगरच्या तिसऱ्या प्रकल्पाचंही भूमीपूजन झालंय. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून चार वेगवेगळ्या जागांहून येणाऱ्या लोकांना यामुळे फायदा होईल.

पायाभूत सुविधांवर सरकारने गेल्या चार वर्षात लक्ष केंद्रीत केलंय. देशात कनेक्टिव्हिटी म्हणजेच हायवे, हवाई मार्ग, जलमार्ग यांचा विस्तार आणि काम वेगाने सुरु आहे. कारगिल ते कन्याकुमार आणि कच्छ ते कामरुपपर्यंत तुम्ही प्रवास केला तर काम किती वेगाने सुरु आहे त्याचा अंदाज येईल.

मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी कमी वेळ लागावा म्हणजे त्यांना खेळण्यासाठी आणि अभ्यासाला जास्त वेळ देता येईल. तासनतास ट्राफिकमध्ये अडकून 8-9 तासांच्या ऑफिससाठी कुणीही 12 ते 13 तास देऊ शकत नाही.

सरकारने देशातल्या मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी जे धोरण बनवलंय, त्या अंतर्गत तयार होणारा हा पहिला मार्ग आहे. पीपीपी म्हणजेच खाजगी, सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून हा प्रकल्प बनवला जाणार आहे.

गेल्या चार वर्षात 300 किमी नव्या मार्गाचं काम सुरु झालंय आणि 200 किमीचा प्रस्ताव मंजूर केलाय. याचाच परिणाम म्हणून देशात 500 किमीपेक्षा जास्त मेट्रो धावत आहे आणि जवळपास साडे सहाशे किमी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातही केंद्र आणि राज्य मिळून 200 किमी मेट्रोचं जाळं उभारत आहेत.

जन्मप्रमाणपत्रापासूनची प्रत्येक सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे. वीज बिल, पाणी बिल, रुग्णालयाची अपॉईंटमेंट, बँकेचा व्यवहार, पेंशन, पीएफ, शाळा-कॉलेज प्रवेश, आरक्षण अशा जवळपास सर्व सुविधा ऑनलाईन मिळत आहेत, जेणेकरुन रांगेत थांबावं लागू नये.

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा आपल्याकडे तयार आहे. शिवाय हजारो तरुणांची इनोव्हेटिव्ह माईंडची एक फौज तयार आहे.

स्टार्टअप इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून भारत तंत्रज्ञानाचं मोठं केंद्र बनला आहे. स्टार्टअपच्या बाबतीत भारत जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI