कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न, ऑडिट कमिटी नेमणार

सागर जोशी

| Edited By: |

Updated on: Nov 18, 2020 | 10:03 AM

कोरोनाच्या मृतांची कारणं विशेषत: उपचार, उपचाराची वेळ, अन्य आजार, उपचारातील तज्ज्ञांचा सल्ला आणि या प्रक्रियेचा परिणाम अशा सर्व घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. महापालिकेकडून नेमण्यात येणाऱ्या कमिटीचा उद्देश कोरोनाचा मृत्यूदर शुन्यावर आणणं हा असणार आहे.

कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न, ऑडिट कमिटी नेमणार

Follow us on

पुणे: पुणे शहरात कोरोनाचा मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. कोरोना मृत्यूची कारणं शोधण्यासाठी महापालिका ऑडीट कमिटी नेमली जाणार आहे. या कमिटीच्या कामकाजावर महापालिकेली नजर असणार आहे. ही कमिटी प्रत्येक रुग्ण आणि मृतांची सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.(Audit committee from Pune Municipal Corporation to find out the cause of death of Corona)

कोरोनाच्या मृतांची कारणं विशेषत: उपचार, उपचाराची वेळ, अन्य आजार, उपचारातील तज्ज्ञांचा सल्ला आणि या प्रक्रियेचा परिणाम अशा सर्व घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. महापालिकेकडून नेमण्यात येणाऱ्या कमिटीचा उद्देश कोरोनाचा मृत्यूदर शुन्यावर आणणं हा असणार आहे. पुणे महापालिका या कमिटीच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी ही माहिती दिली आहे.

पुणेकरांनो काळजी घ्या, महापौर मोहोळ यांचं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे आकडे कमी येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावधान करणारं ट्विट केलं आहे. तसंच कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्पही बोलून दाखवला आहे.

जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांनी आता ज्यादा काळजी घेणं उचित आहे. आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे, असं महापौर मोहोळ म्हणाले.

अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

पुण्यातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी आणि गतीमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं आहे. अजित पवारांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर अशी या चार अधिकाऱ्यांची नावे (Pune Covid 19 Special Officer Appoint) आहेत. हे अधिकारी पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहाय्य करतील. राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.

संबंधित बातम्या:

Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता, यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो काळजी घ्या, महापौर मोहोळ यांचं आवाहन

पुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी!, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही

Audit committee from Pune Municipal Corporation to find out the cause of death of Corona

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI