दुधाच्या गाडीतून बिअरची विक्री, पुणे पोलिसांकडून 29 हजार रुपयांची दारु जप्त

दुधाच्या कॅनमागे बिअरचे बॉक्स लपवून शहरात आणणाऱ्या एका वाहनचालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात (Illegal Liquor selling During lockdown) घेतले आहे.

दुधाच्या गाडीतून बिअरची विक्री, पुणे पोलिसांकडून 29 हजार रुपयांची दारु जप्त
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 5:31 PM

पुणे : दुधाच्या कॅनमागे बिअरचे बॉक्स लपवून शहरात आणणाऱ्या एका वाहनचालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात (Illegal Liquor selling During lockdown) घेतले आहे. ही कारवाई काल (13 एप्रिल) रात्री कात्रज घाटात वाहनांची तपासणी सुरु असताना करण्यात आली. या वाहनात 29 हजार रुपयांचे 12 बिअर बॉक्स होते. पोलिसांनी बिअर जप्त केल्या असून अधिक (Illegal Liquor selling During lockdown) चौकशी सुरु आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. यामध्ये जीवनावश्यक गोष्टी मेडिकल, भाजीपाला, फळं, दूध आणि किराणा या सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त वाहनांच्या तपासणी करीता ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकांबदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. याच दरम्यान कात्रज येथे नाकाबंदी सुरु असताना एका पोलीस अधिकाऱ्यांना दुधाची गाडी घेऊन फिरत असलेल्या चालकावर संशय आला.

या चलाकाला पोलिसांनी थांबवून त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान चालक खोटं बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दुधाच्या गाडीची तपासणी केली असता. दुधाच्या कॅरेटमागे 12 बिअर बॉक्स सापडले.

मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा विक्री

एक तरुण महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. ही धक्कादायक घटना काल (13 एप्रिल) पुणे येथे घडली. पुणे पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ‘चरसी’चं बिंग फुटलं. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पुणे पोलिसाकडून अवैद्य गुटखा तस्करी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळ काल (13 एप्रिल) नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं. नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या स्विफ्टमधून ही अवैध गुटखा वाहतूक केली जात होती. आरोपींना पकडल्यानंतर, भलताच प्रकार समोर आला. गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये किशोर धावडे नावाचा आरोपी हा पुण्याती शिरुर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार असल्याचं उघड झालं.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!

मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणायला, पुण्यातील धक्कादायक चित्र, लॉकडाऊनमध्येही गांजा विक्री

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.