AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा मी बुडतोय, 26 वर्षीय सीएचा शेवटचा फोन, गाडी सापडली, पण व्हिक्टरचा पत्ताच नाही!

व्हिक्टर सांगळे (Victor Sangle missing )  हा 26 वर्षाचा तरुण सीए आहे. व्हिक्टरला (Victor Sangle missing ) डावा पाय नाही. कृत्रिम पायाने तो त्याची सर्व कामं करतो.

दादा मी बुडतोय, 26 वर्षीय सीएचा शेवटचा फोन, गाडी सापडली, पण व्हिक्टरचा पत्ताच नाही!
| Edited By: | Updated on: Sep 27, 2019 | 5:02 PM
Share

Victor Sangle missing पुणे : पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस (Pune heavy rain) अनेकांच्या जीवावर उठला आहे. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता आहे.  सध्या पाऊस थांबला असला, तर बुधवारी रात्री पावसाने माजवलेल्या हाहाकाराची दाहकता हळूहळू समोर येत आहे. ओढ्या-नाल्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग सापडत आहे. याच ओढ्या नाल्यांच्या कडेला आर्मीचे जवान गेल्या दोन दिवसांपासून एका गाडीचा शोध घेत आहेत. ही गाडी तर सापडली मात्र या गाडीतील 26 वर्षांच्या तरुणाचा पत्ता नाही.

26 वर्षीय CA बेपत्ता

व्हिक्टर सांगळे (Victor Sangle missing )  हा 26 वर्षाचा तरुण सीए आहे. व्हिक्टरला (Victor Sangle missing ) डावा पाय नाही. कृत्रिम पायाने तो त्याची सर्व कामं करतो. तो ट्रेकिंगच्या निमित्ताने आसाम, मेघालयला गेला होता. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता तो पुण्यात आला. त्याच दिवशी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पुण्यातील विमान नगर परिसरातून आपल्या मावशीला भेटायला वानवडीला निघाला होता. तुफान पावसाने हाहाकार माजवला.  रस्त्यावरील पाणी बघता बघता वाढलं. पाणी इतकं वाढलं की व्हिक्टरची गाडी क्षणात तरंगायला लागली. काही कळायच्या आतच शिंदे छत्री परिसरात रस्त्यावरील पाण्याचा लोंढा समुद्रातील महाकाय लाटेप्रमाणे आला, आणि व्हिक्टरला चारचाकी गाडीसह नाल्यातून वाहून घेऊन गेला.

बुडणाऱ्या गाडीतून भावाला फोन

व्हिक्टरची गाडी  गंटागळ्या खात होती. कोणी मदतील येईल या आशेने व्हिक्टरने गाडीचे लाईट सुरु करुन सिग्नल दिले. शिंदे छत्री परिसरातील नागरिक घराच्या गच्चीवरुन हा थरार पाहात होते. त्यावेळी हे दृश्य पाहणारेही हतबल होते. या नाल्याच्या कडेला असलेल्या घराच्या गच्चीवरुन व्हिक्टरच्या जीवन मरणाचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचवेळी व्हिक्टरने बुडणाऱ्या गाडीतून मावसभावाला फोन करुन, आपण बुडत असल्याची माहिती दिली. एका पायाने अधू असलेला व्हिक्टर धडपड करत होता. व्हिक्टरने केलेला कॉल हा त्याच्याशी संपर्क झालेला आजपर्यंतचा शेवटचा संपर्क ठरलाय.

रात्र-दिवस शोध

व्हिक्टरच्या कॉलनंतर त्याचे नातेवाईक आणि विशेषत: मित्रांनी त्याचा रात्रंदिवस शोध घेतला. बुधवारी रात्री 11 पासून त्याची शोधाशोध सुरु आहे. गुरुवारचा संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र गेली, तरी ना व्हिक्टर सापडला ना त्याची भली मोठी टाटा टियागो कार.

व्हिक्टरचा भाऊ सीमेवरुन मदतीला

व्हिक्टरचा भाऊ स्टीफन सांगळे हे भारतीय लष्करात मेजर या पदावर कार्यरत आहेत. कोसळणाऱ्या पावसात भाऊ वाहून गेल्याची माहिती त्यांना कळताच, स्टीफन सांगळे विमानाने तातडीने पुण्यात आले.

36 तासांनी गाडी सापडली

मेजर स्टीफन सांगळे आणि त्यांच्या मित्रांनी, तसंच आर्मीच्या जवानांनी ओढे-नाले पालथे घातले. आज सकाळी 11 च्या सुमारास वानवडी परिसरातील नाल्यात गाडीचा पांढरा छत दिसला. शोधकार्य करणाऱ्या मित्रांनी त्यावर दगड टाकून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. तो आवाज गाडीचाच असल्याचा अंदाज आला.

त्यानंतर तातडीने आर्मीच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. तब्बल 36 तासांनी व्हिक्टरची गाडी हाती लागली.

व्हिक्टर कुठे आहे?

एका पायाने अधू असलेल्या व्हिक्टरच्या गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. डोळ्यात प्राण आणून व्हिक्टरचा भाऊ मेजर स्टीफन त्याचा शोध घेत आहेत. गाडीच्या फुटलेल्या काचांमधून व्हिक्टर बाहेर पडला असावा, कुणीतरी त्याला रुग्णालयात दाखल केलं असावं किंवा अन्य अशी भाबडी आशा सांगळे कुटुंबीयांना आहे.

पुण्यात निसर्गाच्या रुद्रावताराने अनेकांना उद्ध्वस्त केलं. व्हिक्टरच्या गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. व्हिक्टर सुस्थितीत सापडेल ही वेडी आशा आजही नातेवाईकांना आहे. एखादा चमत्कार घडेल आणि मृत्यूवर व्हिक्टरी मिळवून व्हिक्टर पुन्हा परत येईल, असा विश्वास त्याच्या आई वडिलांना आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.