AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळांना भेटीसाठी तासभर वाट का बघायला लावली?; शरद पवारांनी नेमकं कारण सांगितलं

Sharad Pawar on Chhagan Bhujbal Meeting : सिव्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जात भुजबळांनी पवारांची भेट घेतली मात्र या वेळी छगन भुजबळांना भेटीसाठी तासभर वाट बघावी लागली. भुजबळांना का बघायला लावली?, शरद पवारांनी नेमकं कारण सांगितलं. वाचा सविस्तर...

छगन भुजबळांना भेटीसाठी तासभर वाट का बघायला लावली?; शरद पवारांनी नेमकं कारण सांगितलं
छगन भुजबळ, शरद पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 1:27 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अस्थिरता आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला आहे. अशात छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. परवा दिवशी दुपारी छगन भुजबळ हे ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी छगन भुजबळ यांना पवारांच्या भेटीसाठी तासभर वाट पाहावी लागली. भुजबळांना तासभर ‘सिल्व्हर ओक’मध्ये का थांबावं लागलं? याबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे. भुजबळांसोबत काय बोलणं झालं? तसंच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबाबत शरद पवार यांची भूमिका काय आहे? हे देखील त्यांनी सांगितलं.

छगन भुजबळांना का थांबावं लागलं?

भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्या आधी ते बीडला गेले. बारामतीतही चांगले भाषण केलं. दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. मला ताप होता. मी दोन दिवस सुट्टी काढली. मला सांगितलं भुजबळ साहेब आले. मला सांगितलं एक तासापासून आले. जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर ते आले मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी केल्या तर राज्याचं हित आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण दुरुस्त करायचं असेल तर मी आलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

आरक्षणाबाबत काय म्हणाले?

मी बैठकीला गेलो नाही. दोन कारणे होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेचं उपोषण सुरू होतं. त्यांना भेटले. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहीत नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटलं.

भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायाचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही. तसं दिसलं नाही, असं पवारांनी यावेळी सांगितलं.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.