VIDEO : कमी उंचीमुळे शाळेत मुलं चिडवतात, 9 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

वर्गातील मुले दररोज उंचीवरुन चिडवत असल्यामुळे 9 वर्षाच्या मुलाने स्वत:चा गळा दाबत आत्महत्येचा प्रयत्न (Australia little boy try to suicide due to kidding) केला.

VIDEO : कमी उंचीमुळे शाळेत मुलं चिडवतात, 9 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न


कॅनबेरा : वर्गातील मुले दररोज उंचीवरुन चिडवत असल्यामुळे 9 वर्षाच्या मुलाने स्वत:चा गळा दाबत आत्महत्येचा प्रयत्न (Australia little boy try to suicide due to kidding) केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुलाच्या आईने रेकॉर्ड केला आहे.  मस्करी करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, असं या मुलाच्या आईने या व्हिडीओमध्ये सांगितले (Australia little boy try to suicide due to kidding) आहे.

या 9 वर्षीय लहान मुलाला एक आजार झाला आहे. या आजारात त्याचे डोके मोठे आणि उंची लहान झाली आहे. त्यामुळे शाळेत दररोज त्यांच्या उंचीवरुन मस्करी केली जाते. या मस्करीला कंटाळून मुलगा आईला किल मी करत स्वत:चा गळा दाबत आहे. मुलाची उंची जवळपास 65 सेंटीमीटर आहे.

मुलाची आई जेव्हा मुलाला शाळेत घ्यायला जाते तेव्हा मुलगा रडत असल्याचा व्हिडीओ ती रेकॉर्ड करते. यामध्ये मुलगा रडताना दिसत आहे. तसेच आपला गळा दाबत तो स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि किल मी असं सतत आईला सांगत आहे. तर तो आपले डोकंही आपटून घेत आहे.

“कृपया तुमच्या कुटुंबाला, मुलांना जागरुक करा जेणेकरुन ते कुणाची मस्करी करणार नाहीत. मस्करी केल्यामुळे मुलं आत्महत्याही करु शकतात. माझ्या मुलाने या घटनेची तक्रार शाळेतील मुख्याधापकांकडे केली होती. अनेकदा ही गोष्ट माझ्या मुलासोबत घडली आहे. तुमच्यासाठी ही मस्करी असू शकते. पण त्यामुळे कुणाचा जीवही जाऊ शकतो”, असं मुलाची आई रडत व्हिडीओमध्ये सांगत आहे.

“तुम्ही मस्करी केल्यामुळे काय होत आहे बघा, कुणाच्या कुटुंबाचा विचार करा ते कसे राहत असतील. मस्करी केल्यामुळे 9 वर्षाचा मुलगा किती कंटाळलेला आहे की तो स्वत: आत्हमत्या करण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही मुलाची आई म्हणाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI