AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Lockdown | रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन, अदिती तटकरे यांची घोषणा

15 जुलै ते 24 जुलै या कालावधीसाठी रायगड लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली

Raigad Lockdown | रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन, अदिती तटकरे यांची घोषणा
| Updated on: Jul 13, 2020 | 4:51 PM
Share

रायगड : रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस ‘कोरोना’ रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 जुलै ते 24 जुलै या कालावधीसाठी रायगड लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली. (Raigad District Lockdown for 10 Days amid Corona Outbreak)

रायगड जिल्ह्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा साडेसात हजारांवर गेला आहे. त्यामुळे 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत दहा दिवसांसाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरु राहणार आहेत. सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 7 हजार 551 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 4 हजार 291 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 260 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात 212 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

महिन्याभरापूर्वी रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. यामध्ये अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने पाहणी करुन मदतीचा हात दिला होता.

हेही वाचा : पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

कुठे-कुठे लॉकडाऊन वाढवला?

पुणे,  पिंपरी चिंचवड – मंगळवार 14 जुलैच्या मध्यरात्री एक वाजल्यापासून 23 जुलैपर्यंत – 10 दिवस लॉकडाऊन

ठाणे – लॉकडाऊनमध्ये 19 जुलैपर्यंत वाढ

भिवंडी – लॉकडाऊनमध्ये 19 जुलैपर्यंत वाढ

(Raigad District Lockdown for 10 Days amid Corona Outbreak)

नवी मुंबई – लॉकडाऊनमध्ये 19 जुलैपर्यंत वाढ

नांदेड – 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून आठवडाभरासाठी लॉकडाऊन घोषित

सोलापूर शहर – 16 ते 26 जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन

(Raigad District Lockdown for 10 Days amid Corona Outbreak)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.