लोकल प्रवासासाठी खोटे ओळखपत्र, अनेकांवर गुन्हे, रेल्वे पोलिसांची कारवाई

एका नागरीकाने सरकारी कर्मचाऱ्याच्या वेषातील खोटा फोटो लावून खोटे ओळखपत्र बनवले आहे.

लोकल प्रवासासाठी खोटे ओळखपत्र, अनेकांवर गुन्हे, रेल्वे पोलिसांची कारवाई

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या आणि शासनाने मंजूर केलेल्या (Fake ID For Travelling From Local) सेवेतील प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र. काही जण खोटे ओळखपत्र बनवून प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली असून त्यांना अटक केली आहे (Fake ID For Travelling From Local).

एका नागरीकाने सरकारी कर्मचाऱ्याच्या वेषातील खोटा फोटो लावून खोटे ओळखपत्र बनवले आहे. फक्त रेल्वेतून प्रवास करता यावा म्हणून या व्यक्तीने हा उपादव्याप केला आणि खोटे ओळखपत्र बनवले.

कल्याणहून मुंबईकडे प्रवास करताना योगेंद्र महेंद्र मिरसा या आरोपीला ठाणे येथे अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरु असून अनेक जणांवर कारवाई होत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.

लोकल प्रवासासाठी अवघ्या 500 रुपयात फेक क्यूआर कोड

लोकल प्रवासासाठी खोटा पास बनवल्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ज्या व्यक्तींना त्याने पास बनवून दिले आहेत, त्यांनाही अटक करण्यात आली.

कोव्हिड संकट पाहता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी 15 जूनपासून लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये, म्हणून महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम सुरु केली होती. याचाच फायदा घेण्यासाठी बोगस क्यूआर कोड बनवणारी टोळी सक्रिय झाली. दरम्यान, या व्यक्तीने आतापर्यंत जवळपास 400 ते 500 फेक क्यूआर कोड लोकांना बनवून दिले आहेत.

Fake ID For Travelling From Local

संबंधित बातम्या :

Mumbai Local Train | मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 15 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 700 फेऱ्या होणार

Published On - 4:49 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI