सातारा कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, कुठे गारांचा वर्षाव, तर कुठे वादळाने झाडांची पडझड

पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज (31 मे) मुसळधार पाऊस झाला आहे (Rain in Satara Kolhapur before mansoon ).

सातारा कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, कुठे गारांचा वर्षाव, तर कुठे वादळाने झाडांची पडझड
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 6:34 PM

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज (31 मे) मुसळधार पाऊस झाला आहे (Rain in Satara Kolhapur before mansoon ). सातारा शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सातारा शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडलेली पाहायला मिळाली. शेतीचंही नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या पाऊसामुळे सातारकरांची मोठी धांदल उडाली होती.

दुसरीकडे कोल्हापूरसह उपनगराला देखील पावसाने झोडपले. तेथेही वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच्या सुरु झालेल्या उकाड्यानंतर काही वेळातच पावसाच्या सरी बसरल्या. यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांची मात्र चांगलीच तारांबळ झाली. दरम्यान, राज्यभर उष्णतेची लाट सुरु आहे. दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालली आहे.

परभणीत या वर्षी उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुढील 5 दिवस मराठवाड्यातील तापमान हे 41 ते 44 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता परभणी हवामान खात्याने वर्तवली आहे. 31 मे ते 3 जून दरम्यान मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हा मान्सून पाऊस नसून अवकाळी पाऊस आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असं आवाहन परभणी कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ डॉक्टर कैलास डाखोरे यांनी केलं आहे.

मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्याचं वातावरण पोषक आहे. मान्सून 30 मे रोजी केरळात दाखल झाला आहे. 8 जूनला राज्याच्या दक्षिण भागात मान्सून प्रवेश करेल. 16 जूनपर्यंत मान्सून उत्तर भाग व्यापून टाकेल असा अंदाज आहे. 31 मेपासून 2 जूनपर्यंत राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

हेही वाचा :

रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी वरळीत उभारणार 100 बेड्सचे कोव्हिड सेंटर

एका बाकावर एक विद्यार्थी, ऑनलाईनसोबत ऑफलाईन शिक्षण, शाळेबाबत नियमांवर बैठकीत चर्चा

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, तब्बल 1421 पोलिसांना कोरोनाची तीव्र लक्षण

Rain in Satara Kolhapur before mansoon

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.