राज्यपालांना विमान वापरण्याच्या परवानगीवरुन राजकारण, राजभवनाचा दावा काय?

याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. (Raj Bhavan Official Statement)

राज्यपालांना विमान वापरण्याच्या परवानगीवरुन राजकारण, राजभवनाचा दावा काय?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे स्पष्टीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्य शासनाने दिले आहे. (Raj Bhavan Official Statement On denying airplane to Governor)

नेमकं प्रकरणं काय? 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

राजभवनाचा दावा काय?

महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड मसुरी येथे निघाले होते. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या 122 व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगतसिंग कोश्यारी होते. शुक्रवारी 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम नियोजित होता.

त्यानुसार राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबईहून गुरुवारी 11 फेब्रुवारी 2021 रोजी देहरादूनसाठी 10 वाजता निघणार होते.

या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना 2 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपालांनी सरकारी विमानाचा वापर करण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळविण्यात आले होते.

त्यानुसार आज, 11 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपाल सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय राज्यपालांना सांगण्यात आले की शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही.

त्यानंतर राज्यपालांच्या निर्देशानुसार, मुंबई येथूनच देहरादूनसाठी व्यावसायिक विमानाचं तिकीट तातडीने बूक करण्यात आलं. हे विमान दुपारी 12.15 वाजताचं होतं. त्या विमानाने ते देहरादूनला रवाना झाले.

🛑राज्य शासनाचं स्पष्टीकरण काय?🛑

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. (Raj Bhavan Official Statement On denying airplane to Governor)

संबंधित बातम्या : 

राज्यपालांना आधीच कळवलं होतं, परवानगी नाही, CMO चं स्पष्टीकरण

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात