ऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीने केलेल्या ऑपरेशन जीवनरक्षकची गंभीर दखल घेतली आहे (Rajest Tope on remdesivir black marketing and TV9 sting operation).

ऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीने केलेल्या ऑपरेशन जीवनरक्षकची गंभीर दखल घेतली आहे (Rajest Tope on remdesivir black marketing and TV9 sting operation). रेमडेसिव्हिरसारख्या कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा काळबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यापुढेही असं करताना कुणी आढळल्यास कारवाई केली जाईल, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीचाही उपयोग केला जात असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

राजेश टोपे म्हणाले, “आधी खबऱ्यांना केवळ काही हजारांमध्ये तरतूद होती, आता मात्र आम्ही ही तरतूद 20-25 लाख रुपयांपर्यंत केली आहे. ही रक्कम खबऱ्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून देण्यात येते. याचा उद्देश रेमडेसिव्हिर, मास्क आणि ऑक्सिजन सारख्या गोष्टींच्या पुरवण्याचा तुटवडा होऊ न देणे असा आहे. आपण 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच ठेवण्याचा नियम केला आहे. असं असताना कुणी ऑक्सिजन इंडस्ट्रीला देत असेल, त्याचा काळाबाजार करत असेल तर त्या गोष्टींवर कारवाई करणं महत्त्वाचं आहे. त्यात या खबऱ्यांच्या माहितीचा उपयोग होतो. साथीच्या रोगात कुणीही स्वार्थी वृत्तीने वागून चालणार नाही, त्यांनी भान ठेवलं पाहिजे. माणुसकीचा दृष्टीकोन ठेऊन माणुसकी जपली पाहिजे.”

“रेमडेसिव्हिरचा साठा मोठे लोक करत आहेत असं वाटत नाही. कारण हे औषध तयार करणाऱ्या औषध निर्मिती कंपन्यांना त्यांनी त्यांच्या कोणत्या अधिकृत विक्रेत्याला किती औषधं दिलीत याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाला दाखवणं बंधनकारक आहे. पुढे जाऊन कोणत्या रुग्णांना ही औषधं दिली, ते रुग्ण कुठे अॅडमिट आहेत या सर्व गोष्टींचा हिशोब एफडीएने बघितला तर काळा बाजाराचा कुठलाही संबंध येणार नाही. एफडीए विभागाला अशी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

“जगभरात लॉकडाऊनची नाही, तर अनलॉकची भाषा”

राजेश टोपे म्हणाले, “आपल्याला आर्थिक घडी पुन्हा बसवावी लागणार आहे. जगभरात अमेरिकेपासून युरोपीय संपूर्ण खंडापर्यंत सर्व ठिकाणी आता लॉकडाऊनची भाषा केली जात नसून अनलॉक केलं जातंय. परंतू शिस्त पाळली पाहिजे, स्वयंशिस्त ठेवली पाहिजे. नागरिकांनी स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) पाळल्या पाहिजे. त्याचाच भाग म्हणून अनलॉक 5 मध्ये हॉटेल, रेस्टॉरन्ट, फुड बार, बार या सर्व गोष्टी 50 टक्क्यांपर्यंत चालू होत आहेत.”

“काही रेल्वेंना परवानगी देण्यात आली आहे. डबेवाल्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. एमएमआरमधील काही उद्योगधंदे देखील सुरु केले जात आहेत. सीईटीसारख्या परीक्षा देखील होत आहेत. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. असं असलं तरी याचे काही धोके देखील आहेत. मात्र, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे यासाठी देखील काम सुरु आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही अत्यंत प्रभावी मोहिम आपण राबवत आहोत. यात 11 कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Remdesivir Medicine | रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजारांना, पाच जणांना अटक

राजेश टोपेंकडून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची कबुली, शरद पवारांकडून तात्काळ व्यवस्था

रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे

संबंधित व्हिडीओ :

Rajest Tope on remdesivir black marketing and TV9 sting operation

Published On - 1:24 pm, Thu, 1 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI