देशातील इंचभर जमीनही बळकावू देणार नाही; राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा

भारत-चीन सीमेवर शांतता असावी अशी आमची इच्छा आहे. हा तणाव निवळला पाहिजे, असं सांगतानाच देशातील इंचभर जमीन कुणालाही बळकावू देणार नाही. आमचे जवान त्यासाठी सज्ज आहेत, असा निर्वाणीचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचं नाव न घेता दिला.

देशातील इंचभर जमीनही बळकावू देणार नाही; राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा

दार्जिलिंग: भारत-चीन सीमेवर शांतता असावी अशी आमची इच्छा आहे. हा तणाव निवळला पाहिजे, असं सांगतानाच देशातील इंचभर जमीन कुणालाही बळकावू देणार नाही. आमचे जवान त्यासाठी सज्ज आहेत, असा निर्वाणीचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचं नाव न घेता दिला. (Rajnath Singh Performs ‘Shastra Puja’ in Darjeeling)

राजनाथ सिंह यांनी आज सकाळी दार्जिलिंगच्या सुकना युद्ध स्मारकात जाऊन शस्त्रांची पूजा केली. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत लष्कर प्रमुख एमएम नरवणेही उपस्थित होते. भारत-चीन सीमेवर तणाव राहू नये, तिथे शांतता प्रस्थापित व्हावी, हा आमचा उद्देश आहे. मात्र तरीही अशा घटना होत असतात. पण आमचे सैनिक कोणत्याही परिस्थितीत देशाची एक इंच जमीन कुणालाही बळकावू देणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

यावेळी त्यांनी गलवानमध्ये चीनने केलेल्या विश्वासघाताचा पुनरुच्चारही केला. गलवानमध्ये जे काही झालं, त्यावेळी आपल्या सैनिकांनी घेतलेली भूमिका इतिहासात लिहिली जाईल. त्यांच्या शौर्याची गाथा सुवर्णाक्षरात लिहिली जाईल.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी विजया दशमीनिमित्त ट्विटरवरून देशावासियांना शुभेच्छा दिल्या. सिक्कीमच्या नथुला सेक्टरमध्ये जाऊन शस्त्रपूजन करणार असल्याची माहितीही त्यांनी ट्विटरवरून दिली होती. (Rajnath Singh Performs ‘Shastra Puja’ in Darjeeling)

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi LIVE | पंतप्रधान मोदी यांची ‘मन की बात’

कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय…

शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा

(Rajnath Singh Performs ‘Shastra Puja’ in Darjeeling)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI