धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून, अमरावतीमधील घटना

शुल्कक कारणावरून झालेल्या भांडणातून मुलांनं वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भिलोना येथे ही घटना घडली. (Amravati Murder)

धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून, अमरावतीमधील घटना

अमरावती : धान्य विकण्याच्या शुल्कक कारणावरून झालेल्या भांडणातून मुलांनं वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भिलोना येथे ही घटना घडली. रमेश मालवे असे मृत व्यक्तींचं नाव आहे. (Ramesh Malave was murdered by his son in Bhilona village of Amravati)

आश्चर्यजनक बाब म्हणजे हा आरोपी मुलगा रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपला होता. दरम्यान, सकाळी ही घटना उघडकीस आली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण मालवे वय २५ याला अटक केली आहे.

रमेश मालवे वय ५५ हे पत्नी व एका मुलासह भिलोना येथे राहत होते. तर, त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह बाजूला राहतो. बुधवारी रमेश मालवेंनी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणले होते. आरोपी बाळकृष्णने ते धान्य विकले आणि तो दारू पिउन घरी आला. रमेश आणि मुलगा बाळकृष्ण यांच्यामध्ये वाद झाला.याच वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी काठी मारून त्यांचा खून केला.आरोपी मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर तो रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपून राहिला.

दरम्यान, रमेश मालवे यांच्या मोठ्या मुलालं ते घराबाहेर न दिसल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तर बाळकृष्ण मृतदेहाच्या बाजूला झोपलेला आढळला. पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण मालवेला अटक केली आहे असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या :

करणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय, भावडांकडून चौघांच्या हत्येची सुपारी

अनैतिक संबंधातून तिघी मायलेकींची हत्या, बुलडाणा हादरलं!

( Ramesh Malave was murdered by his son in Bhilona village of Amravati)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI