चिपळूणमध्ये 22 लाखांची वीज चोरी, चोरांविरोधात कठोर कारवाई

चिपळूणच्या उक्ताड येथील मरियम अपार्टमेंटमध्ये हा वीज चोरीचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे.

चिपळूणमध्ये 22 लाखांची वीज चोरी, चोरांविरोधात कठोर कारवाई
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 3:24 PM

रत्नागिरी : ग्राहकांकडे थकीत असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने (Electricity Theft) प्रयत्न सुरु केलेले असतानाच चिपळूणमध्ये लाखो रुपयांच्या वीज चोरीची घटना उघडकी आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महावितरणने या वीज चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे (Electricity Theft).

चिपळूण शहरातील उक्ताड येथे मरियम अपार्टमेंट या इमारतीमधील तब्बल बारा सदनिकांना चोरुन वीजपुरवठा सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. याबाबत रहिवाशांनीच केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आता यासंदर्भात महावितरणकडून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.

चिपळूणच्या उक्ताड येथील मरियम अपार्टमेंटमध्ये हा वीज चोरीचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. मिरजोळी परिसरात असलेल्या मात्र प्रत्यक्षात चिपळूण नगर परिषद हद्दीत येणाऱ्या उक्ताड येथे मरियम अपार्टमेंट नावाने नवीन इमारत विकसित करण्यात आली आहे. मात्र, या इमारतीला महावितरणकडून अधिकृत वीज पुरवठा देण्यात आलेला नाही.

त्यामुळे बाजूच्याच बिल्डिंगमधून थेट सहीस वायर टाकून मरियम इमारतीत वीज आणून त्यातील बारा सदनिकांमध्ये वीज पुरवठा देऊन अनधिकृतपणे विजेचा वापर सुरु होता. या इमारतीमध्ये ए कादीर तांबे यांच्या वीज मीटरकरिता विद्यूत खांबावरुन एक केबल टाकण्यात आली. त्या केबलवर बी पेज न्यूटरलवरुन सर्व्हिस वायर मीटर बायपास करुन घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ती सर्विस वायर डीपी स्विचला देण्यात आली असून त्याच स्विचवरुन मरियम अपार्टमेंटमधील ए विंग मधील 12 सदनिकाधारकांना जारा बिल्डर अँड डेव्हलपर पार्टनर अहमद अब्दुल रहेमान मुकादम आणि गियासुदीन हसन चोघुले यांनी चोरुन वीज दिल्याचं उघडकीस आलं आहे (Electricity Theft).

येथील सदनिका धारक बिलकीस हलदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हलदे यांनी महावितरणकडे तक्रार केल्यानंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा वीज चोरीचा प्रकार पाहिला. हा प्रकार उघड झाल्यानंतर महावितरणने पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण केल्याचं सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी पंचनामा करण्यात येत आहे. वीज चोरी करणाऱ्या 12 सदनिकाधारकांची ओळख पटवण्यात आली आहे. हा वीज चोरीचा प्रकार कधीपासून सुरु होता. त्यात सोसायटीचे आणखी काही लोक सहभागी आहेत का? आतापर्यंत किती युनिट वीज चोरी करण्यात आली आणि त्यापोटी महावितरणचं किती नुकसान झालं? याची जुळवाजुळव करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या परिसरातील सोसायट्यांमध्ये वीज चोरीचे असेच प्रकार सुरु आहेत का? आणि या बिल्डरच्या इतर सोसायट्यांध्येही वीज चोरी होत आहे का? याचा तपासही करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Electricity Theft

संबंधित बातम्या :

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सोमवारी ‘शॉक’साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे- फडणवीस

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’ वीज बिलावरून नितेश राणेंची जहरी टीका

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.