कैद्यांचा घरगड्यासारखा वापर, रत्नागिरी जेलमधील धक्कादायक प्रकार

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विशेष कारागृहाच्या कारभारावरच प्रश्न चिन्हं उपस्थित झालं आहे. रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचे व्हिडिओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत.

कैद्यांचा घरगड्यासारखा वापर, रत्नागिरी जेलमधील धक्कादायक प्रकार

रत्नागिरी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विशेष कारागृहाच्या कारभारावरच प्रश्न चिन्हं उपस्थित झालं आहे. रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचे व्हिडिओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. या जेलमधल्या कैद्यांना चक्क घरकामाला जुंपल्याचं वास्तव समोर येतंय. जेलमधीलच एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान हलविण्याकरिता चक्क कारागृहातील कैद्यांचा हमाल म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे जेलच्या सुरक्षेबाबातच प्रश्न चिन्हं उपस्थित होत आहे.

कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या घरचे सामान चढ-उतार करण्यासाठी इथं कैद्याचा वापर चक्क हमाल म्हणून केला जातोय. पोलिस बंदोबस्तात हे कैदी चक्क कारागृहातील कर्मचाऱ्याच्या घरचे काम करत असल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या कॅमेरात कैद झाले आहेत.

हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर कैद्यांनी काही क्षणात काढता पाय घेतला. याच कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील हा सारा प्रकार आहे. पण या प्रकरामुळे जेल प्रशासन नेमकं करतंय काय असा सवाल उपस्थित होत आहे.

आठ दिवसांपूर्वी याच कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला रुपेश कुंभार हा आरोपी जेल पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेला होता. या प्रकारानंतर जेलमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेला 8 दिवस होत नाहीत तोच एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान हलविण्याकरीता चक्क कारागृहातील कैद्यांचा हमाल म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे जेल प्रशासन नेमकं करतंय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण या व्हिडिओनंतर कागागृह प्रशासनानं चौकशीचे आदेश दिलेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI