‘द कपिल शर्मा’ शोच्या आगामी भागात रितेश आणि जेनेलिया; धम्माल मस्ती पाह्यला मिळणार

द कपिल शर्मा' शोचा एक प्रोमो सध्या खूपच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे दोघेही 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात दिसणार आहेत.

'द कपिल शर्मा' शोच्या आगामी भागात रितेश आणि जेनेलिया; धम्माल मस्ती पाह्यला मिळणार

मुंबई : ‘द कपिल शर्मा‘ शोचा एक प्रोमो सध्या खूपच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे दोघेही ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात दिसणार आहेत. या शोमध्ये कपिल शर्मा आणि रितेशची चांगलीच जुगलबंदी पाह्याला मिळत असून यानिमित्ताने रितेशचा सेन्स ऑफ ह्युमरही प्रेक्षकांना पाह्यला मिळाला.(Ritesh and Genelia will be present in The Kapil Sharma Show)

या शोमध्ये आलेल्या जेनेलिया आणि रितेशची फिरकी घेण्यासाठी कपिलने त्यांना एक मजेशीर सवाल केला. रितेश अभिनेता आहेच. पण तो एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे लग्नाच्यावेळी तू त्याच्यासोबत सात फेरे घेतलेस की त्याच्याकडून राजकीय लोक घेतात तशी शपथ वदवून घेतलीस, असा सवाल कपिलने जेनेलियाला केला. त्याला जेनेलियाने उत्तर देण्याऐवजी रितेशनेच उत्तर देऊन कपिलची बोलती बंद केली. लग्नात आम्ही फेरे घेतले. शपथ घेतली जाते, तेव्हा पाच वर्षांनी सरकार बदलत असते. त्यामुळे आम्ही शपथ न घेता फेरे घेतले आहे, अशी मिश्किल टिप्पणी रितेशने करताच एकच खसखस पिकली.

हा शो अत्यंत मजेदार असा झाला आहे. विनोद, आठवणी, किस्से आदींनी हा शो खच्चून भरला आहे. या शोच्या प्रोमोच्या व्हिडीओमध्येही त्याची झलक पाह्यला मिळत आहे. प्रोमोचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांना ‘द कपिल शर्मा’ या येणाऱ्या भागाबद्दल उत्सुकता लागली आहे.

रितेश-जेनेलियाचे लग्न कधी झाले?

रितेश-जेनेलियाबद्दल सांगायचे झाल्यास, दोघांनी 2003मध्ये ‘मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केला आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले. २०१२ साली दोघांचे लग्न झाले. या दोघांना दोन मुले आहेत, त्यातील एकाच नाव रायन आणि दुसऱ्याचं राहिल आहे. लग्नानंतर जेनेलिया कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र, रितेश आणि जेनेलिया रितेशचे मुळगाव असलेल्या लातुर जिल्हातील बाभळगाव येथील शेतात वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडीओ करताना नेहमीच दिसते..

संबंधित बातम्या : 

नव्या वेब सीरिजसाठी कपिल शर्मा 20 कोटी घेणार?

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सिद्धूचे पुनरागमन?

(Ritesh and Genelia will be present in The Kapil Sharma Show)

Published On - 7:38 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI