सरसंघचालकांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणाले, आता भिडे गुरुजींना विचारा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंची फिरकी घेतली.

  • Updated On - 10:43 am, Sat, 10 April 21
सरसंघचालकांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणाले, आता भिडे गुरुजींना विचारा!
Amol Mitkari_Mohan Bhagwat_Sambhaji Bhide


मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) फिरकी घेतली आहे. मोहन भागवत यांना कोरोना झाल्याच्या बातमीला कोट करताना, अमोल मिटकरी यांनी आता भिडे गुरुजींची प्रतिक्रिया घ्या, असं ट्विट केलं आहे. अमोल मिटकरी म्हणतात, “कृपया पत्रकार बांधवांनी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!” (RSS chief Mohan Bhagwat tested corona positive NCP MLC Amol Mitkari said now ask Sambhaji Bhide)

अमोल मिटकरी यांचं ट्विट

संभाजी भिडे काय म्हणाले होते?

कोरोना आणि मास्कबद्दल संभाजी भिडे यांनी नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कोरोना हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं संभाजी भिडे म्हणाले होते.

“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.

मोहन भागवत यांना कोरोना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

VIDEO : संभाजी भिडे काय म्हणाले होते? 

संबंधित बातम्या  

RSS सरसंघचालक मोहन भागवतांना कोरोनाची लागण, नागपुरातील रुग्णालयात दाखल

VIDEO : कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, संभाजी भिडे पुन्हा घसरले

(RSS chief Mohan Bhagwat tested corona positive NCP MLC Amol Mitkari said now ask Sambhaji Bhide)