RSS Corona | आरएसएसच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव, 9 स्वयंसेवक पॉझिटिव्ह

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Sep 20, 2020 | 7:56 AM

आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

RSS Corona | आरएसएसच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव, 9 स्वयंसेवक पॉझिटिव्ह

नागपूर : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे (RSS Swayamsevak Corona Positive). आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या स्वयंसेवकांवर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर संपर्कातील इतर स्वयंसेवकांची क्वारंटाईन राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे (RSS Swayamsevak Corona Positive).

मुख्य म्हणजे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा याच मुख्यालयात राहतात. मात्र ते सध्याच्या काळात बाहेर आहेत.

नागपुरात 49946 जणांची कोरोनावर मात

नागपूर शहरात सतत कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. तर मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारी बाब म्हणजे बरं होणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत 49,946 जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरं होणाऱ्यांचं प्रमाण 79.88 इतकं आहे.

गेल्या 24 तासात 1,550 जणांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनामुळे 52 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय, 1,629 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 62,531 वर पोहचली. तर मृत्यूंची संख्या 1,992 वर पोहोचली आहे (RSS Swayamsevak Corona Positive).

नागपुरात जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस

नागपुरात आज जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे. काल मिळालेला संमिश्र प्रतिसाद बघता आज जनता कर्फ्यूला किती प्रतिसाद मिळतो या कडे लक्ष लागून आहे. काल शहरात मार्केट लाईन बंद होती. मात्र, रस्त्यावर नागरिक पाहायला मिळाले.

नागपुरात सतत वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यूचं प्रमाण बघता महापौरांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. मात्रस नागपूरकरांचा त्याला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

RSS Swayamsevak Corona Positive

संबंधित बातम्या :

फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला

नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालयाला मान्यता, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर सरकारचा निर्णय

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI