सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कोरोना संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी अन्य काही चाचण्या

राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Sudhir Mungantiwar Tested Corona Positive)

सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कोरोना संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी अन्य काही चाचण्या

चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या चंद्रपुरातील घरी कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी चाचणी करुन घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरद्वारे दिली. (Sudhir Mungantiwar Tested Corona Positive)

माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी नियमानुसार स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत क्वारंटाईन व्हावं, असे ट्विट मुनगंटीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसीय विधीमंडळ अधिवेशनला जाणे टाळले होते. त्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यानंतर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी मुनगंटीवार यांच्या अन्य काही चाचण्या करुन घेतल्या जात आहेत. सध्या तरी त्यांच्यावर घरीच उपचार केले जाण्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.

तसेच त्यांच्या घरातील अन्य सदस्यांची देखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी नियमानुसार स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले आहे. (Sudhir Mungantiwar Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

शिवसेना खासदार विनायक राऊतांची कोरोनावर मात, नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज

काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *