Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील 'व्हिलन' ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Nov 29, 2020 | 1:09 PM

मुंबई : यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. पण, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली. अनेक बरेच ट्विस्ट आणि मनोरंजक वळणं सध्या ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळत आहेत. सलमान खानने वीकेंड वॉर’मध्ये बिग बॉस 14 च्या घरातील सदस्यांना मोठा धक्का दिला आहे. यावेळी बिग बॉसचा 14 चा फिनाले जानेवारीत नव्हे तर पुढच्या आठवड्यात होणार आहे असे सांगितले. त्या फिनालेसाठी घरात फक्त 4 सदस्य राहतील.(Rubina, Nikki and Jasmine are the villains in the Bigg Boss house)

सलमान खान घरातील सदस्यांना ‘व्हिलन’ टास्क देतो. या व्हिलनच्या खूर्चीवर घरातील सदस्य रुबीना दिलैकला बसवतात. कविता कौशिक, जास्मीन भसीन, राहुल वैद्य रूबीनावर विविध आरोप करतात. रुबीनावर करण्यात आलेल्या आरोपांवर तिने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, जास्मीन मैत्रीण म्हणत म्हणत खूप चुकीची वागली आणि त्याचे मला वाईट वाटले. फक्त एका टास्कसाठी तिने मैत्री तोडली आहे. रुबीना नंतर जास्मीन आणि निक्की तांबोळी यांनाही ‘व्हिलन’ च्या खूर्चीवर बसवले जाते. या दोघींवर देखील विविध आरोप करण्यात येतात. सलमान खानने रुबीनाचे या आठवड्यातील कामगिरीचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, या आठवड्यात ती खूपच चांगली खेळली आहे. सलमानने रूबीनाचे केलेले कौतुक पाहून घरातील इतर सदस्यांना धक्का बसतो

बिग बॉसच्या घरात सध्या रुबीना दिलैक, कविता कौशिक, एजाज खान, राहुल वैद्य, निक्की तंबोली, जास्मीन भसीन, अली गोनी, अभिनव शुक्ला आणि पवित्र पुनिया हे 9 सदस्य आहेत. तर, यापैकी निक्की तंबोली आणि एजाज खान सुरक्षित आहेत. तर इतर सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत.

बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये जास्मीन आणि तिची टिम जिंकली, त्यानंतर घराच्या कर्णधारपदाची निवड करण्याची वेळ आली आहे. घराचा नवीन कर्णधार कोण बनणार हे स्पर्धकांना मिळून ठरवायचे होते. मात्र, एकमत न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही. निक्की आणि राहुल या दोघांनी घराचे कर्णधार बनायचे होते.

अभिनव आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट?

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा

Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!

(Rubina, Nikki and Jasmine are the villains in the Bigg Boss house)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें