AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला

केवळ दुकाने सुरु होऊन दारुचा महसूल मिळत नसतो, अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली (Saamana Editorial Criticizes Raj thackeray) आहे.

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला
अयोध्येत एवढा मोठा लढा झालाय. त्यामुळे प्रत्येकानेच तिथे गेले पाहिजे. किंबहुना महाराष्ट्रातील सर्वचे नेत्यांनी अयोध्येत जायला पाहिजे.
| Updated on: Apr 25, 2020 | 10:05 AM
Share

मुंबई : महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Saamana Editorial Criticizes Raj thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली होती. या मागणीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत संगीत मागणी केली, त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असा प्रश्नही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रावरुन पहिल्यांदाच सामनाच्या (Saamana Editorial Criticizes Raj thackeray) संपादकीयमध्ये राज ठाकरे यांच्या फोटोसह लेख छापण्यात आला आहे. “राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करुन मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर,” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“लॉकडाऊनमुळे फक्त वाईन शॉप बंद आहे असे नाही, तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे हे कारखाने सुरु करावे लागतील. हा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरु होऊन दारुचा महसूल मिळत नसतो,” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचा : महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“जर दारुचे कारखाने सुरु करायचे म्हणजे कामगारांची गर्दी आणि वाईन शॉप सुरु करायचे म्हणजे अक्षरश: रेटारेटी आणि हाणामारी. लोक भाजी, अन्न धान्य वैगरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत. पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल, त्याची कल्पनाच करवत नाही. अनेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारु खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखी असेल.” असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

“गेल्या 35 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात चोऱ्या-माऱ्या दरोडे असे गुन्हे घडले नाही. पण मुंबई ठाणे आणि अन्यत्र जे काही दरोडे पडले ते वाईन शॉपवरच. जी लुटमार झाली ती वाईन शॉपचीच,” असेही सामनाच्या अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले (Saamana Editorial Criticizes Raj thackeray)आहे.

संबंधित बातम्या : 

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.