AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेक अकाउंटमागे भाजपची आयटी टीम, मुंबई पोलीस भाजपचा मास्टरमाईंड लवकर पकडतील : सचिन सावंत

ट्विटरवरील फेक अकाउंटमागे भाजपच्या आयटी टीमचा हात आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केली आहे (Sachin Sawant on twitter fake account).

फेक अकाउंटमागे भाजपची आयटी टीम, मुंबई पोलीस भाजपचा मास्टरमाईंड लवकर पकडतील : सचिन सावंत
| Updated on: Nov 03, 2020 | 11:36 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर लाखो फेक अकाउंटच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली जात असल्याची माहिती सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्टच्या चौकशीत उघड झाली आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या फेक अकाउंटमागे भाजपच्या आयटी टीमचा हात आहे, असा आरोप सावंत यांनी केली आहे (Sachin Sawant on twitter fake account).

“मी स्वत: काँग्रेस पक्षातर्फे फेक अकाउंटची चौकशी करण्याची मागणी केली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन सोशल मीडियावर हजारो फेक अकाउंटद्वारे महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. याचे पुरावे मी मुंबई पोलिसांना दिले होते”, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.

“पोलिसांना दिलेल्या पुराव्यात प्रोफेशनल कंपन्या आणि अकाऊंटची यादीही दिली होती. यामागे भाजपची आयटी टीम आहे, असं सांगितलं होतं. आम्हाला समाधान आहे की, काँग्रेस पक्षातर्फे समाजहित साध्य करण्याचे जे प्रयत्न झाले ते सत्कारणी लागले. अपेक्षा आहे की, मुंबई पोलीस यामागील भाजपातील मास्टरमाईंड लवकरच पकडतील”, अशी आशा सचिन सावंत यांनी व्यक्त केली (Sachin Sawant on twitter fake account).

ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट

फेक अकाउंद्वारे ट्विटरवर बदनामीची मोहीम चालवली जात होती. ट्विटरवर जवळपास दीड लाख बोगस अकाउंट आहेत. हे अकाउंट नेपाळ, पनामा या देशांमधून उघडण्यात आली आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या तपासात उघड झाली आहे. अगदी प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री यांच्या नावाने अकाउंट उघडण्यात आले होते. याबाबत अधिक तपास केला असता अभिनेत्री रविना टंडनच्या नावाचा वापर करुन फेक अकाउंट उघडण्यात आल्याचं समोर आलं. कट करुन मुंबई पोलीस, पोलीस आयुक्त यांच्या विरोधातील मेसेज सोशल मीडिवर पसरवले जात होते.

संबंधित बातमी : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट, सायबर विभागाच्या तपासात उघड

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.