पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, सलमान खान आता ‘असा’ दिसतो?

पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, सलमान खान आता 'असा' दिसतो?


मुंबई : भारतासह जगभरातील लाखो-हजारो तरुणींच्या गळ्यातील ताईत ‘लाखों दिलों की धडकन’ अभिनेता सलमान खान याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे.

सलमानच्या डोक्यावरचे केस पांढरे झाले आहेत, चेहऱ्यावरही सुरकुत्या, चष्मा अशा अवतारातील सलमान खानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘रेस थ्री’ सिनेमानंतर सलमान कुठल्याही सिनेमात दिसला नाही, शिवाय, कुठल्या कार्यक्रमातही सलमान दिसला नाही. त्यामुळे सलमानचा सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोवरुन सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे.

थांबा… तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. सलमान खान काही म्हातारा-बितारा झाला नाहीय. सलमानचा म्हाताऱ्याचा लूक त्याच्याच आगामी ‘भारत’ सिनेमातील आहे. म्हाताऱ्याच्या लूकसाठी प्रत्येकवेळी सलमानला तब्बल अडीच तास मेकअप करावा लागत होता.

सलमानच्या या लूकबद्दल बोलताना ‘भारत’ सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाले, “असा लूक करणं मोठं कठीण होतं. अशा प्रकाकच्या मेकअपसाठी अडीच तासांचा अवधी जायचा. या लूकसाठी 20 वेगवेगळ्या प्रकराच्या मिशा आणि दाढी ट्राय केली होती.”

ईदच्या दिवशी सलमान खानचा ‘भारत’ सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये सलमान खानसह अभिनेत्री तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, नोरा फतेही आणि सुनील ग्रोव्हर यांच्यासारखे कलाकार आहेत.

2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या ट सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल आता ईदच्या दिवशीच कळेल.

पाहा ट्रेलर :