संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य

हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वावर बोलताना 'वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते' असं खालच्या पातळीचं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं

संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 26, 2019 | 8:22 AM

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वावर बोलताना ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’ असं खालच्या पातळीचं वक्तव्य भिडेंनी केलं. संभाजी भिंडेंनी मातृत्वावरुन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य केल्यामुळे राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जणांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त (Sambhaji Bhide on Childless Woman) केला आहे.

सांगलीत नागरिकत्व सुधारणा (सीएए) कायदा आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजी भिडे यांनी स्त्रीत्वाचा अनादर करणारं वक्तव्य केलं. ‘जसं नपुंसकात पुरुषत्व कमी असतं, तस वांझेमध्ये स्त्रीत्व कमी असतं. त्यांना आपण नपुंसक आणि वांझ असे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे’, असं संभाजी भिडे म्हणाले.

जेव्हा राष्ट्रवादाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होतो. भारतात मुस्लिम समाजाकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करणं ‘मूर्खपणाचं’ आहे, असंही भिडे म्हणाले. नागरिकत्व सुधारणा (सीएए) कायद्याविषयी भिडे सांगलीमध्ये बोलत होते.

राष्ट्रहिताच्या प्रश्नावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडतो, मात्र काही जण याविषयी भ्रम पसरवतात, असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडे यांची जीभ घसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. नाशिकमध्ये एका व्याख्यानादरम्यानही त्यांनी असंच चमत्कारिक विधान केलं होतं. ‘माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे’ असा अजब दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्यानंतरही भिडेंवर टीकेची झोड उठली होती.

भिडेंना पुण्यात जिल्हाबंदी

संभाजी भिडे आणि ‘हिंदू एकता आघाडी’चे मिलिंद एकबोटे यांना पुण्यात चार दिवसांची जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकबोटे आणि भिंडेंसह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sambhaji Bhide on Childless Woman

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.