AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रयतेची सेवा, पूरग्रस्तांसाठी 5 कोटी खर्च करणार : संभाजीराजेंचा संकल्प

खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी पूरग्रस्त भागात 5 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. संभाजीराजेंनी (Sambhaji Chhatrapati) ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

रयतेची सेवा, पूरग्रस्तांसाठी 5 कोटी खर्च करणार : संभाजीराजेंचा संकल्प
| Updated on: Aug 12, 2019 | 10:49 AM
Share

कोल्हापूर  : पुराने वेढलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला राज्यभरातून मदत होत आहे. राज्य सरकारसह अनेक संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट मदत करत आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी पूरग्रस्त भागात 5 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati ) ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

“माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाजसेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे”,  असं संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजेंनी आर्थिक मदतीची घोषणा करताना, मदतीवेळी माझा फोटो लावू नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. “कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त लोकांना मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका! जे काही द्यायचं आहे ते निस्वार्थ भावनेनं द्या!” असं संभाजीराजे म्हणाले.

महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो घरं पूर्ण बुडाली आहेत. त्यामुळे लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. असंख्य हेक्टर शेती पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातून सर्व काही निसटलं आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना पुन्हा उभारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे.

हायवेवरी वाहतूक एकेरी सुरु

महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Sangli Kolhapur Flood)  पाणी आता ओसरू लागलं आहे. पंचगंगेची पाणी पातळी आता 50 फुटांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 41 गावात अद्यापही जवळपास 15 हजार लोकं अडकलेली आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावर (Pune bengaluru highway) तब्बल 30 हजारपेक्षा जास्त वाहनं अडकलेली आहेत. ठप्प असलेल्या पुणे-बंगळुरु महामार्गावर बंगळुरुच्या दिशेने एकेरी वाहतूक सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरु करण्यात आली. शिरोली फाट्यानजीक महापुराचे पाणी ओसरल्याने अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो ट्रक बंगळुरुकडे रवाना झाले आहेत. पण कोल्हापूरवरुन पुण्याकडे जाणारी वाहतूक अजूनही ठप्प आहे.

संबंधित बातम्या 

Maharashtra Flood | शिरोळमध्ये 15 हजार लोक अडकून, पुणे-बंगळुरु हायवेवरुन एकेरी वाहतूक सुरु  

मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्राविषयी आकस असल्यानेच महापुराकडे दुर्लक्ष : पृथ्वीराज चव्हाण 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.