जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावं, संजय राठोड यांचं आवाहन

यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टरांनी जनतेचे हित लक्षात घेऊन कामावर रुजू व्हावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. Sanjay Rathod appeal to doctors

जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावं, संजय राठोड यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 7:45 AM

यवतमाळ- जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. कोरोनाचे संकट हे अतिशय गंभीर असून आजच्या परिस्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. (Sanjay Rathod appealed doctors to take back agitation)

कोरोनाच्या संकटात शासन-प्रशासन तसेच गावपातळीवरील सर्व यंत्रणा अतिशय जोमाने लढत आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्वांची एकजूट असणे आवश्यक असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दुपारी चर्चा करण्यात आली आहे. प्रशासन व आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यापैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाम न राहता जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन शिष्टमंडळाला केल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, संपूर्ण यंत्रणा तसेच ग्रामपातळीवरील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींच्या अथक प्रयत्नामुळेच सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यु नव्हता. सर्वांच्या प्रयत्नाने जिल्हा नियंत्रणात होता. आताही इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी चांगलीच आहे, याचे संपूर्ण श्रेय येथील सर्व यंत्रणांना जाते, असे राठोड म्हणाले आहेत.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’या अभियानाचे रुपांतर जनमोहीमेत करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या बैठका यापुढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात घेण्यासाठीही नियोजन करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील परिस्थतीबाबत मुख्यमंत्री यांना माहिती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनीसुध्दा डॉक्टरांचे म्हणणे ऐकूण घेतले आहे. संपूर्ण यंत्रणा युध्दजन्य परिस्थतीसारखी कोरोनाचा सामना करीत असून त्यासाठी काही मतभेद झाले असतील तर ते नक्कीच सोडविण्यात येतील. मात्र, नागरिकांचा विचार करून डॉक्टरांनी आपली सेवा बजावावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

यवतमाळमध्ये डॉक्टर-कलेक्टरमधील वाद चिघळला, तहसीलदारांचा डॉक्टर संघटनेला पाठिंबा

यवतमाळमध्ये डॉक्टर्स V/s जिल्हाधिकारी यांच्यातील संघर्ष वाढला

(Sanjay Rathod appealed doctors to take back agitation)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.