पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महमार्गावर शनिवारी पहाटे सातारा पोलिसांनी एका खासगी आराम बसवर छापा टाकला.

पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महमार्गावर शनिवारी पहाटे सातारा पोलिसांनी एका खासगी आराम बसवर छापा टाकला. पोलिसांनी यावेळी अवैधरित्या वाहतूक होत असलेले 3 कोटी 64 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. (Satara Police seized 3 crore 64 lakh gold and silver jewelery from private bus on Pune-Bangalore highway)

सातारा जिल्हयात राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खासगी आराम बसमधून अवैधरित्या सोन्या-चांदीची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे महामार्गावर नागठाणे चौकात पोलिसांनी कोल्हापूरहून आलेली खासगी आरामबस थांबवून तिची झडती घेतली. यावेळी बसच्या डिकीमध्ये 25 गोण्या संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी सदर बस बोरगाव पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेतली. ही पोती उघडून पाहिल्यावर त्यात 3 कोटी 54 लाख 76 हजार 800 रुपयांचे 591 किलोग्राम वजनाचे चांदीचे दागिने सापडले. तर 9 लाख 37 हजार 300 रुपयांचे एकूण 19 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेदेखील सापडले आहेत.

या गोण्यांविषयी बस चालकाकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूर येथील सोनसिंह परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार यांची नावे सांगितली. या तिघांची चौकशी करुन पोलिसांनी या सर्व चांदी-सोन्याच्या दागिन्यांचे बिल मागितले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे बोरगाव पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला आहे.

या प्रकरणात कोल्हापूरहून मुंबईकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी-सोन्याचे दागिने घेऊन ही बस कोणाकडे निघाली होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी दिली.

संबंधित बातम्या

“ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ” दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत

भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक

काकीने फसवून ड्रग्जचे पाकीट पाठवले, कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा झालेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस NCB च्या हाती

धक्कादायक! गाडी अडवली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांनी तलवारीने केले वार

(Satara Police seized 3 crore 64 lakh gold and silver jewelery from private bus on Pune-Bangalore highway)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI