अष्टपैलू सतीश राजवाडेकडे ‘स्टार प्रवाह’ची नवी जबाबदारी!

मुंबई: मुंबई-पुणे- मुंबईसह अनेक प्रसिद्ध मराठी सिनेमांचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे नव्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड अर्थात कार्यक्रम प्रमुख म्हणून ते नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. सतीश राजवाडेंसारखा अभिनेता, दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक असं अष्टपैलू व्यक्तीमत्व ही जबाबदारी सांभाळणार असल्याने, स्टार प्रवाहवर नक्कीच नवे प्रयोग पाहायला मिळतील अशी आशा […]

अष्टपैलू सतीश राजवाडेकडे 'स्टार प्रवाह'ची नवी जबाबदारी!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई: मुंबई-पुणे- मुंबईसह अनेक प्रसिद्ध मराठी सिनेमांचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे नव्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड अर्थात कार्यक्रम प्रमुख म्हणून ते नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. सतीश राजवाडेंसारखा अभिनेता, दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक असं अष्टपैलू व्यक्तीमत्व ही जबाबदारी सांभाळणार असल्याने, स्टार प्रवाहवर नक्कीच नवे प्रयोग पाहायला मिळतील अशी आशा प्रेक्षकांना आहे. येत्या दोन दिवसात सतीश राजवाडे पदभार सांभाळतील.

सतीश राजवाडे  यांनी स्वत: असंभव,अग्निहोत्र,गुंतता हृदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या जबरदस्त मालिकांचं दिग्दर्शन केलं होतं. या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

दुसरीकडे सतीश राजवाडेंचे मुंबई-पुणे-मुंबईचे तीनही भाग, प्रेमाची गोष्ट, मृगजळ एक डाव धोबीपछाड,गैर,बदाम राणी गुलाम चोर,पोपट,सांगतो ऐका, मुंबई दिल्ली मुंबई (हिंदी चित्रपट) हे सिनेमेही प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेले. त्यामुळे आता सतीश राजवाडे नव्याने प्रेक्षकांची मालिकांची अपेक्षा कसं पूर्ण करतो हे पाहावं लागेल.

सतीश राजवाडेचा अनुभव दांडगा आहे. त्याची कल्पनाशक्ती उत्तम आहे. त्यामुळे तो नवी जबाबदारी उत्तमरित्या पेलेल यात शंका नाही. सतीश राजवाडेच्या नव्या इनिंगला टीव्ही 9 मराठी डिजीटल टीमकडून खूप खूप शुभेच्छा!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.