शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांनी कुठेही कृषी विधेयकाला विरोध केलेला नाही तर त्यांनी रविवारी राज्यसभेत जो प्रकार घडला त्याबद्दल उपोषणाला बसलेल्या खासदारांच्या कृतीचं समर्थन केले आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. Sharad Pawar is not opposed to the agriculture bill Says Devendra fadanvis

शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस

नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कुठेही कृषी विधेयकाला विरोध केलेला नाही तर त्यांनी रविवारी राज्यसभेत जो प्रकार घडला त्याबद्दल उपोषणाला बसलेल्या खासदारांच्या कृतीचं समर्थन केले आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar is not opposed to the agriculture bill Says Devendra fadanvis)

देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कृषी विधेयकावरून काँग्रेसवर निशाणा साधत पवारांना टोला लगावला. राज्यसभेत जर त्या खासदारांनी तसे वर्तन केले नसते तर शरद पवारांना आज एका दिवसांचा अन्नत्याग करावा लागला नसता, असा टोला देखील फडणवीसांनी यावेळी लगावला.

देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर असल्याने त्यांना तेथील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. मेयो आणि एम्स रूग्णालयांना भेटी देत त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. तसंच त्यानंतर प्लाझ्मा डोनेट कॅम्प सुरू असलेल्या ब्लड बँकेला देखील त्यांनी भेट दिली.

शरद पवारांचा एक दिवसांचा अन्नत्याग 
“मी गेली अनेक वर्ष संसदेत काम करतोय. परंतू विरोधकांच्या मतांना किंमत न देता बहुमताच्या जोरावर कायदे पास करण्याची प्रथा सुरू झाली आहे. रविवारी सभागृहात विरोधक बोलत असताना, त्यांची चर्चा करण्याची तयारी असताना देखील चर्चा न करता विधेयक रेटून नेण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच विरोधी खासदारांचं निलंबन देखील करण्यात आलं. पीठासन अधिकाऱ्यांचं असं वर्तन मी गेल्या अनेक वर्षांत पाहिलं नाही”, निलंबित खासदारांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवारांनी आज एक दिवसांचा अन्नत्याग केला.

पवारांच्या अन्नत्यागावर फडणवीसांचा टोला
राज्यसभेतल्या प्रकारानंतर व्यतित होत पवारांनी एक दिवसांचा अन्नत्याग केल्याचं मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावर “राज्यसभेत जर त्या खासदारांनी तसे वर्तन केले नसते तर शरद पवारांना आज एका दिवसांचा अन्नत्याग करावा लागला नसता”, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.

रविवारी राज्यसभेत अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. कृषी विधेयकावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला. तसंच तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर उपसभापतींनी आठ खासदारांचं निलंबन केलं. यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचा देखील समावेश आहे.

संबंधित बातम्या-

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी

लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या ‘गोंधळा’वर निलेश राणेंचा निशाणा

(Sharad Pawar is not opposed to the agriculture bill Says Devendra fadanvis)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI