पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीला

संरक्षणमंत्र्यांसमोर अहमदनगरमधील 23 गावांचे मुद्दे मांडून स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घेण्याची तसेच के के रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची मागणी शरद पवारांनी केली.

पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीला

नवी दिल्ली : सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 23 गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांची उपजीविका आणि सुरक्षेचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. (Sharad Pawar meets Defense Minister Rajnath Singh with Parner NCP MLA Nilesh Lanke)

अहमदनगर जिल्ह्यातील गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट व मेहनत करुन ते आपली उपजीविका करतात. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रकिया गेल्या काही काळापासून सुरु होती. मात्र आता के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप नाकारण्यात येत आहे, असे पवारांनी निदर्शनास आणून दिले.

राष्ट्रीयकृत बँका आणि इतर आर्थिक संस्थांकडूनही स्थानिकांना या कारणास्तव कर्ज नाकारले जात आहे. शूटिंग रेंजमुळे दुसरे मोठे प्रकल्पही इथे होऊ शकत नसल्याने येथील आदिवासी जनतेसाठी उत्पन्नाचे साधन नष्ट होऊ लागले आहे, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

मुळा धरणामुळे हा भाग आता बागायती शेतीचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथील सुमारे एक लाख हेक्टर जमीन या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डाळिंब आणि ऊसाची शेती इथे केली जाते. त्यामुळे येथील लोकांचे इतरत्र स्थलांतर करणेही शक्य नाही, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

शूटिंगच्या सरावामध्ये येथील खारेकर्जुन गावातील अनेक स्थानिकांना आपला जीव गमवावा लागल्याचेही समोर आले आहे. गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये धास्ती निर्माण होऊ लागली आहे, हे पवारांनी राजनाथ सिंहांना सांगितले. (Sharad Pawar meets Defense Minister Rajnath Singh with Parner NCP MLA Nilesh Lanke)

संरक्षणमंत्र्यांसमोर हे सर्व मुद्दे मांडून स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घेण्याची तसेच के के रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची मागणी शरद पवारांनी केली. संरक्षणमंत्र्यांनी के के रेंजसाठी अधिक भूसंपादन होणार नाही याची ग्वाही दिल्याचे पवारांनी सांगितले.

सरावासाठी ही जमीन वापरण्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक अधिकारी यांच्याशी स्थानिक स्तरावर चर्चा करुन निर्णय घेऊ, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी अर्थमंत्र्यांशी बोलून वित्तीय संस्थांची बैठक बोलवण्यात येईल, कर्जाअभावी कोणाचीही विकास थांबू नये, अशी भूमिका संरक्षणमंत्र्यांनी मांडून लंके व शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

संबंधित बातम्या –

निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी

(Sharad Pawar meets Defense Minister Rajnath Singh with Parner NCP MLA Nilesh Lanke)

Published On - 4:25 pm, Fri, 18 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI