कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पीडित कुटुंबाला पवार म्हणाले, कर्ज फेडू नका, मी बघतो!

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शरद पवार यांनी खडकत गावापासून दुष्काळी दौरा केला. पवारांनी चार ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मात्र परत जाताना शरद पवारांना एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समजलं. आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील शरद साबळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती […]

कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पीडित कुटुंबाला पवार म्हणाले, कर्ज फेडू नका, मी बघतो!
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 3:38 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शरद पवार यांनी खडकत गावापासून दुष्काळी दौरा केला. पवारांनी चार ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मात्र परत जाताना शरद पवारांना एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समजलं.

आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील शरद साबळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती पवारांना मिळाली. यानंतर तातडीने शरद पवारांचा ताफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी पोहोचला.

शरद पवार आणि धनंजय मुंडे अचानक भेटीला आल्याने पीडित कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. साबळे कुटुंबाने कर्ज कसे फेडायचे अशी चिंता व्यक्त केली. त्यावेळी कर्ज फेडू नका आम्ही पाहून घेतो, असा धीर शरद पवारांनी दिला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा आधार देऊन शरद पवार पुढच्या प्रवासाला निघाले.

वाचा –   VIDEO : साहेब, धनुभाऊला मुख्यमंत्री करा, पवारांसमोर शेतकऱ्याची मागणी   

बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी इथे चारा छावणीत शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना अचानक बोलायला उठलेल्या शेतकऱ्याने “धनुभाऊ सारखा मुख्यमंत्री जर कधी झाला ना” असं म्हटलं आणि सभेत एकाच जल्लोष झाला. शेतकऱ्याने हे वाक्य उच्चारल्यानंतर शरद पवार यांनीही हात उंचावून होकार दिला.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें