शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक

शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध म्हणून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.

शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:58 PM

पुणे : शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध म्हणून शेकापच्या वतीने आमदार जयंत पाटील यांनी 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. यावेळी या कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. (Shekap jayant patil Call India Strike)

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची पुण्यात आज बैठक पार पडली. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या वेळी माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, बाबा आढाव, आदी नेते उपस्थित होते.

देशातील 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झालेचे जयंत पाटील यांनी सांगितले.

येत्या 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी बैठका होत आहेत. 18 नोव्हेंबरला अलिबाग येथे पुढील बैठक पार पडणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, 26 आणि 27 नोव्हेंबरला होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

(Shekap jayant patil Call India Strike)

संबंधित बातम्या

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.